IAF Agniveer Recruitment 2023 : वायुसेनेमध्ये भरती..! १२वी पास झालेल्यांसाठी नोकरीची संधी; वाचा डिटेल्स

WhatsApp Group

IAF Agniveer Recruitment 2023 : भारतीय नौदलात ‘अग्निवीर’ बनण्याची चांगली संधी आहे. भारतीय वायुसेनेने अग्निवीरवायू भरती २०२३ ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अग्निवीरवायू भरती परीक्षा २० मे २०२३ रोजी होणार आहे. ही भरती अविवाहित स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आहे.

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार Agniveervayu agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. १७ मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होईल. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ३१ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात.

पात्रता

विज्ञान प्रवाहासाठी: मान्यताप्राप्त मंडळातून गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांपैकी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इंग्रजीमध्ये ५०% गुण असणे आवश्यक आहे. किंवा ५०% गुणांसह तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा. किंवा भौतिकशास्त्र, गणित या दोन गैर-व्यावसायिक विषयांसह २ वर्षांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात ५०% गुण.

विज्ञान प्रवाहाव्यतिरिक्त : ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण. इंग्रजी विषयात ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा – Indian Railways : तुम्हाला माहितीये…ट्रेनच्या शेवटच्या डब्यावरील X चा अर्थ? जाणून घ्या!

वय श्रेणी

पात्र उमेदवारांचा जन्म २६ डिसेंबर २००६ ते २६ जून २००६ दरम्यान झालेला असावा. म्हणजेच वयोमर्यादा २१ वर्षांपेक्षा जास्त नसावी. अधिक तपशीलांसाठी सूचना काळजीपूर्वक वाचा.

भरती कशी होणार?

पात्र अर्जदारांना प्रथम २० मे २०२३ रोजी होणार्‍या ऑनलाइन लेखी परीक्षेत बसावे लागेल. यानंतर शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT) आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.

अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय लष्कर, वायुसेना आणि नौदलात अग्निवीरांची भरती ४ वर्षांसाठी असेल. चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर केवळ २५ टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी नियुक्ती दिली जाईल. प्रशिक्षणादरम्यान, अग्निवीर भारतीय वायुसेना आणि भारतीय वायुसेनेच्या CSD कॅन्टीनचाही लाभ घेऊ शकतो. ४८ लाख रुपयांचा वैद्यकीय विमा असेल. वर्षाला ३० दिवस सुटी मिळेल. याशिवाय आजारी रजेचा पर्यायही असेल.

IAF Agniveer Recruitment 2023 Notification

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment