

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी प्रत्येकी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अधिकृत गोपनीय कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी दोघांना दोषी ठरवण्यात आले. इम्रान खान (वय 71 वर्षे) आणि शाह मेहमूद कुरेशी (वय 67 वर्षे) रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात बंद आहेत.
काय आहे सिफर केस?
इम्रान आणि शाह मेहमूद कुरेशी यांच्याविरुद्धचा हा खटला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. इम्रान खान यांच्यावर सर्वोच्च गुप्त माहितीचा वैयक्तिक वापर केल्याचा आरोप आहे. सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर इम्रान यांनी आपल्या हकालपट्टीमागे अमेरिका असल्याचा आरोप केला होता.
हेही वाचा – हार्ट अटॅक, कॅन्सर, ब्लड प्रेशरवर गुणकारी बिहारचा काळा गहू!
यासाठी वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी दूतावासाने त्यांना एक केबल (टेप किंवा गुप्त माहिती) पाठवल्याचे इम्रान यांनी सांगितले. इम्रान खान यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी वादग्रस्त मुत्सद्दी संभाषण सार्वजनिक केले होते. त्याला ‘सिफर’ (Cypher Case) म्हणत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!