IND vs ENG : शुबमन गिलने पकडला ‘कपिल देव स्टाइल’ अद्भूत कॅच..! पाहा Video

WhatsApp Group

IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना सुरू झाला आहे. हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी इंग्लंडच्या डावाची सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांनी नव्या चेंडूने दोन्ही बाजूंनी आक्रमण करण्यास सुरुवात केली. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्माने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला थांबवले आणि चेंडू फिरकीपटूकडे सोपवला. कुलदीप यादवने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले.

इंग्लंडच्या दोन्ही फलंदाजांनी कुलदीप यादवच्या षटकातील पाच चेंडू सावधपणे खेळले, पण शेवटचा चेंडू बेन डकेटला चुकला. बॅटच्या कडेला आदळल्यानंतर चेंडू हवेत उसळला, पण तो क्षेत्ररक्षकापासून खूप दूर होता. मात्र, असे असतानाही शुबमन गिल उलट्या बाजूला झेल घेण्यासाठी धावला. विरुद्ध दिशेला धावताना शुभमनने बॉलवर आपली नजर ठेवली आणि उत्कृष्ट टायमिंगने 1983 च्या विश्वचषकात कपिल देवच्या शैलीत झेल घेऊन टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले.

हेही वाचा – Petrol Diesel Rate Today ( 07 March 2024) : सीएनजीपाठोपाठ आता पेट्रोल आणि डिझेलही स्वस्त, वाचा आजचे इंधनाचे दर

भारत आणि इंग्लंड यांच्या कसोटी मालिकेतील चार सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने 3 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडला केवळ 1 सामन्यात विजय मिळवता आला आहे. अशा स्थितीत चौथ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघ विजयासह मोहिमेचा शेवट करण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडचा संघ केवळ हैदराबाद कसोटी सामन्यात विजयी झाला होता. यानंतर विशाखापट्टणम, राजकोट आणि रांची कसोटीत भारताने विजयी पताका फडकावली आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment