2035 पर्यंत प्रत्येक भारतीयाला मिळणार ई-पासपोर्ट! आतापर्यंत 80 लाख पासपोर्ट जारी, नेमकं काय बदलणार?

WhatsApp Group

India E-Passport : भारतामध्ये प्रवास आणखी सुरक्षित, जलद आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने देशभरात ई-पासपोर्ट जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2025 पर्यंत 80 लाखांहून अधिक ई-पासपोर्ट जारी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे, की 2035 पर्यंत देशातील प्रत्येक पासपोर्टधारकाकडे ई-पासपोर्ट असेल.

मे 28, 2025 पासून नव्याने जारी झालेला किंवा नूतनीकरण झालेला प्रत्येक पासपोर्ट ई-पासपोर्ट स्वरूपातच दिला जात आहे. वरून दिसायला तो जुन्या पासपोर्टसारखाच असला तरी, मुखपृष्ठावरील अशोकस्तंभाच्या खाली एक अत्याधुनिक ई-चिप बसवण्यात आली आहे. या चिपमध्ये पासपोर्टधारकाची संपूर्ण माहिती सुरक्षीतरीत्या संग्रहित असते.

ई-पासपोर्ट अधिक सुरक्षित कसे?

ई-पासपोर्टच्या मदतीने बनावट पासपोर्ट, डॉक्युमेंट्सचा गैरवापर, ओळख पडताळणीतील चुका मोठ्या प्रमाणात कमी होतील. परराष्ट्र मंत्रालयातील पासपोर्ट व व्हिसा विभागाचे सचिव अरुण कुमार चॅटर्जी यांच्या मते,

  • ई-पासपोर्ट अत्यंत सुरक्षित
  • विमानतळावरील वेळ वाचवणारे
  • प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर
  • आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या नियमांनुसार पूर्णपणे सुसंगत
    असतील.

ई-पासपोर्टमुळे विमानतळावरील इमिग्रेशन प्रक्रियेत मोठे बदल होणार आहेत. प्रवाशांना पासपोर्ट पडताळणीसाठी लांब रांगेत थांबण्याची गरज राहणार नाही. प्रवेशद्वारावर असलेल्या टचस्क्रीनवर पासपोर्टवरील ई-चिप स्कॅन होताच गेट स्वतः उघडेल. अधिकाऱ्यांना प्रत्येक माहिती हाताने तपासण्याची आवश्यकता राहणार नाही.

ही सुविधा जागतिक पातळीवर सुरू असलेल्या ‘Trusted Traveller Program’ चा भाग आहे. भारतात हे दिगीयात्रासारखे अपग्रेडेड स्वरूप म्हणून लागू केले जात आहे.

80 लाख ई-पासपोर्ट जारी

आत्तापर्यंत देशातील 80 लाख नागरिकांना ई-पासपोर्ट देण्यात आले आहेत, तर भारतीय दुतावासांनी जगभरात 60,000 ई-पासपोर्ट जारी केले आहेत. पासपोर्ट प्रक्रिया अधिक सोपी व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पासपोर्ट सेवा केंद्र (PSK) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 511 मतदारसंघात केंद्रे सुरू असून उर्वरित 32 ठिकाणी लवकरच केंद्रे सुरू होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचा दावा आहे की नागरिकांना अधिक जलद, आधुनिक आणि सुरक्षित पासपोर्ट सेवा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिजिटल सुधारणा सुरू आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment