Indian Army Recruitment : भारतीय लष्करात सध्या जवळपास 1.8 लाख सैनिकांची गंभीर कमतरता जाणवत आहे, आणि ही रिक्तता तातडीने भरून काढण्यासाठी मोठा निर्णय घेण्याची तयारी दिसत आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत आर्मीत जेवढ्या प्रमाणात भरती करण्याचा सध्याचा आराखडा आहे, तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
सध्या दरवर्षी 45–50 हजार भरती… आता थेट 1 लाख?
सध्या भारतीय लष्करात दरवर्षी 45 हजार ते 50 हजार अग्निवीर भरती होतात. पण जवानांची वाढती कमतरता पाहता, सेना आता हे प्रमाण दुप्पट करून थेट 1 लाख भरतीपर्यंत नेण्याचा विचार करत आहे.
2020–21 मध्ये कोरोना आणि मोठ्या प्रमाणात निवृत्तीमुळे निर्माण झाला ‘गॅप’
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या अहवालानुसार, कोरोना महामारीच्या काळात 2020-21 मध्ये भरती प्रक्रिया पूर्णपणे थांबली होती. या दोन वर्षांत 1.20 लाख ते 1.30 लाख सैनिक निवृत्त झाले.
हेही वाचा – पिटबुलने सहा वर्षाच्या मुलाचा कान फाडला! CCTV मध्ये कैद व्हिडिओ, अंगावर काटा आणणारी घटना
यानंतर 2022 मध्ये अग्निपथ योजना सुरू झाली. पण निवृत्त झालेल्या जवानांची जागा नवीन भरतीद्वारे भरली गेली नाही. त्यामुळे रिक्त जागांमध्ये झपाट्याने वाढ झाली.
कमी इतकी कशी? कारणे जाणून घ्या
अग्निपथ योजना सुरू होताना 4 वर्षांत जवळपास 1.75 लाख अग्निवीर भरती करण्याची मर्यादा ठरली होती.
- नेव्हीत आणि एअरफोर्समध्येही भरती हळूहळू वाढवून 28,700 पर्यंत नेण्याचा आराखडा होता.
- पण प्रत्यक्षात भरतीची गती कमी राहिली.
- वार्षिक निवृत्ती संख्या मात्र 60,000—65,000 एवढीच राहिली.
यामुळे दरवर्षी भरती कमी आणि निवृत्ती जास्त झाल्याने 20,000–25,000 अतिरिक्त तुटवडा वाढत गेला.
दरवर्षी 1 लाख नवीन भरती?
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सेना आता अग्निवीर भरतीचे प्रमाण मोठ्या स्तरावर वाढवण्याचा विचार करत आहे. सैनिक प्रशिक्षण केंद्रांची क्षमता, इन्फ्रास्ट्रक्चर आणि उपलब्ध संसाधनांचा विचार करून जागा जाहीर केल्या जातील.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!