IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा पुन्हा चुराडा, KKR प्लेऑफसाठी पात्र!

WhatsApp Group

IPL 2024 KKR vs MI : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारी कोलकाता नाइट रायडर्स आयपीएल 2024 प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. इडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात कोलकाताने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. पावसामुळे हा सामना 16-16 षटकांचा करण्यात आला. नाणेफेक गमावलेल्या कोलकाताने मुंबईसमोर 158 धावांचे लक्ष्य ठेवले. पण मुंबईला 139 धावांपर्यंतच पोहोचता आले. कोलकाताचे 12 सामन्यात 18 गुण झाले आहेत. तर मुंबईचा हा नववा पराभव ठरला.

या सामन्यात कोलकाताने निर्धारित 16 षटकात 7 बाद 157 धावा केल्या. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने 21 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 42 धावा केल्या. नितीश राणाने 33, आंद्रे रसेलने 24, रिंकू सिंहने 20 धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – AAI Recruitment 2024 : एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडियामध्ये भरती, परीक्षेशिवाय निवड, 70 हजार रुपये पगार!

कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहित शर्मा (19) आणि इशान किशन (40) यांनी 65 धावांची सलामी दिली. या दोघांनंतर तिलक वर्माने 32 धावांची झुंज दिली. सूर्यकुमार यादव (11), हार्दिक पांड्या (2) स्वस्तात बाद झाले. कोलकाताकडून हर्षित राणा, आंद्रे रसेल आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या.

दोन्ही संघांची Playing 11

कोलकाता नाइट रायडर्स – फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरिन, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, हर्षित राणा, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती.

मुंबई इंडियन्स – नमन धीर, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, पीयुष चावला, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment