जगदीप धनखड यांना नेमकं काय झालं? आजारपणामुळे उपराष्ट्रपतीपदावरून पायउतार

WhatsApp Group

Vice President of India Jagdeep Dhankhar Resignation : काल 21 जुलै 2025 रोजी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या कारणामागे आरोग्यविषयक समस्या असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, प्रश्न असा निर्माण होतो की, धनखड यांना नेमकं कोणतं आजारपण झालं होतं, ज्यामुळे त्यांना एवढं मोठं निर्णय घ्यावा लागला?

धनखड यांच्या राजीनाम्याचं कारण काय?

धनखड यांनी 21 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. पत्रात त्यांनी नमूद केलं की, “चिकित्सकांच्या सल्ल्यानुसार आणि आरोग्याला प्राधान्य देत मी उपराष्ट्रपती पदाचा तत्काळ राजीनामा देत आहे.” त्यांनी आपल्या कार्यकाळात मिळालेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती मुर्मू आणि खासदारांचे आभार मानले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 9 मार्च 2025 रोजी धनखड यांना छातीत वेदना आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांना दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना क्रिटिकल केअर युनिट (CCU) मध्ये ठेवण्यात आलं आणि वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. 12 मार्च रोजी त्यांना घरी सोडण्यात आलं, पण त्यांची तब्येत त्यानंतरही ठणठणीत झाली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, धनखड यांना हृदयाशी संबंधित दीर्घकालीन त्रास होता. वर्षाच्या सुरुवातीलाही त्यांना नैनीताल येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या आजाराची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसली, तरी डॉक्टरांनी त्यांना तणावापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.

उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी आणि त्यावरील तणाव

भारताचा उपराष्ट्रपती हा फक्त संविधानिक पद नसून, त्याला राज्यसभेचे सभापतीपद देखील सांभाळावं लागतं. यामध्ये राजकीय वाद, तणावपूर्ण चर्चा आणि विरोधकांच्या आरोपांचा सामना करणं ही मोठी जबाबदारी असते. त्यामुळेच डॉक्टरांनी त्यांना तणाव टाळण्याचा सल्ला दिला असावा. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या राजीनाम्यातही स्पष्ट दिसतं, “मी जबाबदाऱ्या पूर्ण करू इच्छित होतो, पण आरोग्यामुळे शक्य झालं नाही.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment