Auto News : वाहनप्रेमींना धक्का..! ‘या’ मोठ्या कंपनीने बंद केली लोकप्रिय कार

WhatsApp Group

Auto News : कार उत्पादक कंपनी जीपने त्याच्या भारतीय लाइनअपमधून कंपास स्पोर्ट (Compass Sport) या बेस व्हेरिएंटचे पेट्रोल मॅन्युअल प्रकार काढून टाकले आहे, म्हणजेच ते बंद करण्यात आले आहे. त्याचा बेस व्हेरिएंट आता फक्त १.४-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह ७-स्पीड डीसीटी गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल. त्यामुळे आता त्याच्या पेट्रोल ऑप्शनच्या एंट्री लेव्हलच्या किमतीत वाढ झाली आहे. बंद केलेल्या प्रकारात, कार निर्माता १.४-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन ऑफर करत असे, जे १६३ PS आणि २५० Nm पॉवर आउटपुट तयार करते. यात सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले होते. आता कंपासवर मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय फक्त २.० -लिटर डिझेल युनिटसह उपलब्ध असेल, जे १७२ PS आणि ३५० Nm जनरेट करते.

१.४ लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन बंद करण्यात आले आहे, त्याशिवाय कोणतेही बदल केले गेले नाहीत. या इंजिनसोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सुरू राहील. वाहनाच्या इतर कोणत्याही प्रकारात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कारची किंमत २१.०९ लाख ते ३१.२९ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. जीप कंपास ही भारतीय बाजारपेठेतील एक लोकप्रिय SUV आहे, जी Hyundai Tucson, Tata Harrier, Citroën C5 Aircross आणि Volkswagen Tiguan सारख्या SUV शी स्पर्धा करते.

हेही वाचा – Nothing Phone 1 वर ‘बंपर’ ऑफर, Flipkart वरून स्वस्तात खरेदी करा!

बेस व्हेरिएंट कंपास सपोर्टमध्ये ८.४ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले उपलब्ध होता. यात चार स्पीकर, दुसऱ्या-पंक्तीचे एसी व्हेंट्स, क्रूझ कंट्रोल (केवळ स्वयंचलित), ड्युअल-फ्रंट एअरबॅग्ज, EBS सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ECS) आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांसारख्या वैशिष्ट्यांसह देखील आले आहे. कारचा लूक खूपच आक्रमक आहे आणि याच कारणामुळे लोकांना ती खूप आवडते. तथापि, विक्रीच्या बाबतीत ती टॉप-२५ कारमध्ये कुठेही नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment