Karnataka Chitradurga Bus Accident : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 48 वर गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात स्लीपर कोच बसला पेट घेतल्याने 9 जणांचा मृत्यू झाला तर 21 जण जखमी झाले. हा अपघात इतका अचानक आणि धक्कादायक होता की अनेक प्रवासी झोपेतून उठण्याआधीच ज्वाळांमध्ये सापडले.
या बसमध्ये एकूण 32 जण प्रवास करत होते. बस चालक रफीक सध्या उपचार घेत असून त्याने सांगितले की, तो सुमारे 60–70 किमी प्रतितास वेगाने चालवत असताना अचानक समोरून येणारा कंटेनर ट्रक डिव्हायडर तोडून बसवर आदळला.
“मी बस वाचवण्याचा खूप प्रयत्न केला… बाजूला आणायचा प्रयत्न केला… पण दुसरी बस शेजारच्या लेनमध्ये होती. मग काय झालं हेच आठवत नाही. मी बाहेर कसा पडलो तेही माहीत नाही,” असं रफीकने सांगितलं.
A tragic road accident on NH-48 near Hiriyur in Karnataka’s Chitradurga district claimed at least 11 lives after a container truck jumped the divider and collided with a luxury sleeper bus bound for Gokarna, triggering a massive fire. Most victims were burnt alive. Chief Minister… pic.twitter.com/M6OdHOjUl1
— The Pioneer (@TheDailyPioneer) December 25, 2025
NH-48 वर सेकंदात बदललं सर्व काही
प्राथमिक तपासानुसार कंटेनर ट्रकचा ताबा सुटल्याने तो डिव्हायडर ओलांडून बसच्या डिझेल टँकवर जोरात धडकला. त्यामुळे तात्काळ आग भडकली आणि काही क्षणांत संपूर्ण स्लीपर कोच ज्वाळांनी वेढला गेला.
ट्रक चालक कुलदीप याचाही मृत्यू
बसचे सहायक मोहम्मद सादिक म्हणाले, “मी झोपलो होतो… धडक होताच मी बाहेर फेकला गेलो. चालकही बाहेर पडला. आत झोपलेल्या प्रवाशांना बाहेर पडायलाही वेळ मिळाला नाही.”
9 मृत्यू, 21 जखमी, बहुतांश सुरक्षित
IGP (East) बी. आर. रवीकंठे गौडा यांनी सांगितले की जखमींपैकी बहुतेकांची प्रकृती स्थिर आहे. काही मृतदेह पूर्णपणे जळाल्याने ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्यांची मदत घेतली जात आहे.
42 शाळकरी मुलांचा थरारक बचाव
याच वेळी शेजारच्या लेनमध्ये शैक्षणिक सहलीवर जाणारी शाळेची बस होती. आग लागलेली बस तिच्यावरही आपटली; पण त्या बसचालकाने वेळीच वाहन बाजूला घेत सर्व मुलांना वाचवलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
वाहतूक ठप्प – चौकशी सुरू
या अपघातानंतर बंगळुरू–सीरा मार्गावरील वाहतूक काही तास विस्कळीत झाली. पोलिसांनी हा अपघात कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचे सांगितले असून विस्तृत तपास सुरू आहे.
ही घटना पुन्हा एकदा लांब पल्ल्याच्या प्रवासात सुरक्षित ड्रायव्हिंग आणि वाहनांची नियमित तपासणी किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित करते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा