

Kim Jong Un New Rule : उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनचे अनेक किस्से अनेकदा चर्चेत असतात. पण आता एका नव्या आदेशाने कम्युनिस्ट पक्षाची सत्ता असलेल्या उत्तर कोरियातील जनतेला बोलण्यापूर्वी हजार वेळा विचार करायला भाग पाडले आहे. किम जोंग यांनी आता दक्षिण कोरियामध्ये बोलल्या जाणार्या तथाकथित ‘कठपुतली भाषा’ बोलणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, उत्तर कोरियातील कोणतीही व्यक्ती जो दक्षिण कोरियाच्या भांडवलशाही संस्कृतीची बोली, भाषा किंवा शब्द वापरताना पकडला जाईल, त्याला प्योंगयांग सांस्कृतिक भाषा संरक्षण कायद्यांतर्गत शिक्षा केली जाईल.
या शिक्षेत तुरुंगवास आणि शिबिरात सश्रम कारावास आणि मृत्यूदंडाची शिक्षाही होऊ शकते. उत्तर प्योंगन या वायव्य प्रांतातील एका रहिवाशाने रेडिओ फ्री एशियाला सांगितले की ‘ज्या लोकांना आधीपासून दक्षिण कोरियाच्या उच्चारात बोलण्याची सवय आहे त्यांना आता प्योंगयांग बोलीचा सराव करावा लागेल असे वाटते. अनवधानाने किंवा चुकून त्याच्या तोंडातून बाहेर पडल्यास त्याला कठोर शिक्षा होईल.’
हेही वाचा – केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ कामासाठी Aadhaar ची गरज नाही
उत्तर कोरियामध्ये कोणत्या शब्दांवर बंदी आहे?
नव्या कायद्यानुसार उत्तर कोरियातील महिला त्यांच्या पतीला किंवा प्रियकराला ‘जगिया’ किंवा ‘ओप्पा’ म्हणू शकत नाहीत. त्याऐवजी त्यांनी ‘डोंगजी’ (कॉम्रेड) शब्द वापरावा. उत्तर कोरियन लोकांनी इंग्रजीमध्ये ‘paesyeon’ (फॅशन), ‘hyesutel’ (केशविन्यास) आणि ‘wipyu’ (wife) सारखे दक्षिण कोरियन शब्द वापरण्यापासून परावृत्त केले पाहिजे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की “उघडपणे ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा देखील त्यांनी दक्षिण कोरियन चित्रपट पाहिल्याचा पुरावा आहे”. त्यामुळे अशी भाषा रूढ झाली आहे.
‘भांडवलशाहीच्या कुजलेल्या भाषेचे अस्तित्व नष्ट करण्याचा’ हेतू असल्याने ते हा बदल करत असल्याचा दावा उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. याआधीही दक्षिण कोरियाच्या लोकांसारखे बोलण्यासाठी शिक्षा झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बंदी घातलेले व्हिडिओ आणि म्युझिक अल्बम विकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याची धक्कादायक प्रकरणेही समोर आली आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!