“ती माझी डार्लिंग…”, रश्मिका मंदानासोबतच्या नात्यावर विजय देवरकोंडाचा खुलासा!

WhatsApp Group

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण सातवा सीजन’ सध्या खूप चर्चेत आहे. या आठवड्याचे पाहुणे होते ‘अर्जुन रेड्डी’ अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे. दोघांनी या शोमध्ये डेटिंगपर्यंत अनेक धक्कादायक खुलासे केले. विजय त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल बोलणार का, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. विजयनं समंथा रुथ प्रभूबद्दलच्या भावनाही सांगितल्या.

करण जोहरनं ‘कॉफी विथ करण’ मध्ये विजय देवरकोंडाला बोलतं करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. करणनं विजयला रिलेशनशिप स्टेटसबद्दल प्रश्न विचारला. रश्मिका मंदानासोबतच्या नात्याबद्दल विचारलं. इतकंच नाही, तर तो कधी थ्रीसम करणार का? मात्र, विजयनं त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे काळजीपूर्वक दिली.

हेही वाचा – “मला काही झालं तर नाना पाटेकर…”, तनुश्री दत्तानं पुन्हा उडवून दिली खळबळ; पोस्ट व्हायरल!

विजय देवरकोंडा सध्या बॉलिवूड सौंदर्यवतींच्या मनावर राज्य करत आहे. करणच्या शोमध्ये सारा अली खाननं खुलासा केला की तिला विजयला डेट करायचं आहे. याच शोमध्ये जान्हवीचंही विजयशी नातं असल्याचं समोर आलं होतं. मात्र, त्यानं हे मान्य करण्यास नकार दिला. अनन्या पांडेनं देखील खुलासा केला, की ती विजयवर लाइनवर मारत होती, परंतु त्यानं भाव दिला नाही.

रश्मिकासोबत रिलेशनशिप?

जेव्हा करण जोहरनं विजयला रश्मिका मंदानासोबतच्या रिलेशनशिपबद्दल विचारलं तेव्हा विजय म्हणाला, ”मी तिच्यासोबत सुरुवातीला दोन चित्रपट केले. चित्रपटांच्या माध्यमातून तुम्ही खूप काही शेअर करता. रश्मिका सुंदर आहे. माझी ती डार्लिंग आहे आणि मला ती आवडते. ती खरोखर एक चांगली मैत्रीण आहे.”

यानंतर करणनं विजयला त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारलं, याला उत्तर देताना विजय म्हणाला, ”ज्या दिवशी माझं लग्न होईल. मला मुलं होतील. त्यादिवशी मी हे उघडपणे सांगेन, पण तोपर्यंत मला कोणाला दुखवायचे नाही. मला खात्री आहे की एक अभिनेता म्हणून माझ्यावर प्रेम करणारे बरेच लोक आहेत. मला त्यांना दुखवायचे नाही.”

हेही वाचा – IND Vs WI : रोहित शर्मा अ‍ॅक्शन मोडमध्ये..! नेट्समध्ये खेळला हेलिकॉप्टर शॉट; पाहा VIDEO

विजय आणि रश्मिका यांनी दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. एकाचं नाव ‘गीता गोविंदम’ आणि दुसऱ्या सिनेमाचं नाव ‘डिअर कॉम्रेड’. या दोन्ही चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ घातली होती. दोघांची जोडी सर्वांना खूप आवडली. तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातं, पण त्यावर कधीही शिक्कामोर्तब झालं नाही. मात्र, करणच्याच शोमध्ये जान्हवी कपूर म्हणाली की विजय रश्मिकाला डेट करत आहे!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment