कोलकाता विमानतळावर अचानक उतरली कोरियाची ९ ‘फायटर जेट’ विमानं! काय आहे संपूर्ण प्रकरण?

WhatsApp Group

Korean fighter jets in Kolkata : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील न्यू टाऊन विमानतळाजवळ युद्ध विमानांच्या आवाजानं सर्वांनाच धक्का बसला. एवढी लढाऊ विमानं अचानक आपल्या शहरावर का उडत आहेत, असा विचार प्रत्येकाच्या मनात आला. जेव्हा अचानक युद्ध विमानांचा आवाज ऐकू आला, तेव्हा लोकांमध्ये उत्सुकता आणि भीती दोन्हीची भावना होती. शेवटी, लढाऊ विमानं कोलकात्यात काय करत आहेत? या प्रश्नानं सर्वांनाच घेरलं. खरं तर, मंगळवारी दुपारी दक्षिण कोरियाच्या ९ ब्लॅक ईगल्सना कोलकातामध्ये आश्रय देण्यात आला आहे. ही सर्व विमानं विमानतळाच्या ऍप्रन परिसरात उभी आहेत. ही सर्व कोरियन लढाऊ विमानं आहेत. काळ्या आणि पिवळ्या विमानांवर मोठ्या अक्षरात ब्लॅक ईगल लिहिलेलं आहे. कोलकाता विमानतळ प्राधिकरणानं याबाबत एक ट्वीट केलं आहे.

विमानं कशासाठी उतरली?

ट्वीटनुसार कोरियन लढाऊ विमानं कोलकाता विमानतळावर इंधन भरण्यासाठी आणि वैमानिकांच्या आरामासाठी उतरली. कोरियाची ब्लॅक ईगल विमानं सर्रास प्रशिक्षणासाठी वापरली जातात. ही सर्व विमानं ब्रिटिश एअर शोमध्ये सहभागी होण्यासाठी इंग्लंडला गेली होती. मंगळवारी ती कोलकाता येथे पोहोचली. विमानाच इंधन भरण्यात आलं आणि ते विश्रांतीसाठी तिथंच राहिली. ट्विटरनुसार, दक्षिण कोरियाची युद्ध विमानं जगातील सर्वात मोठ्या एरोस्पेस प्रदर्शनात भाग घेण्यासाठी युरोपला गेली होती. ९ ऑगस्ट रोजी ब्रिटनमधून परतताना वैमानिकांना विश्रांती देण्यासाठी विमानं कोलकाता विमानतळावर उतरली.

हेही वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’ पाहून इंग्लंडचा क्रिकेटर चांगलाच संतापला; म्हणाला, “लज्जास्पद…”

T50 सीरीज हे दक्षिण कोरियाचे पहिलं स्वयं-विकसित लढाऊ विमान आहे. नंतर त्याचे आधुनिकीकरण करण्यात आलं. TA50, FA50 मॉडेल देखील आहेत. दक्षिण कोरियानं २००२ मध्ये पहिल्यांदा T50 सीरिज फायटरचा वापर केला होता. या युद्धविमानात वैमानिक, सहवैमानिक असे एकूण ४० जण होते अशी माहिती आहे. कोलकाता विमानतळ प्राधिकरणानं याबाबत आधीच ट्विट केलं आहे.

Leave a comment