

Vistara Flight Bomb Threat : बुधवारी लंडनहून दिल्लीला येणाऱ्या विस्तारा विमानात बॉम्बची धमकी मिळाली. मात्र, विमान दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. पण मिळालेल्या माहितीनुसार, विमान दिल्लीला पोहोचण्याच्या सुमारे साडेतीन तास आधी विमानाच्या टॉयलेटमध्ये एका प्रवाशाला धमकीचा टिश्यू पेपर दिसला होता. यानंतर त्यांनी क्रू मेंबरला माहिती दिली. मात्र, विमान दिल्लीत उतरवण्यात आले.
असे सांगण्यात आले की विमान दिल्ली विमानतळाच्या आयसोलेशन बेवर नेण्यात आले, जिथे सर्व प्रवाशांचे सामान तपासले गेले. पण काहीही सापडले नाही. विमानाच्या टॉयलेटमध्ये बॉम्बचा संदेश असलेला कागद सापडला, त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती देण्यात आली.
हेही वाचा – Share Market : 3 महिन्यांत 1260 कोटी नफा कमावणाऱ्या कंपनीत पैसे गुंतवण्याची संधी!
विमानात सुमारे 290 प्रवासी होते. विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, लंडनहून दिल्लीला येत असलेल्या फ्लाइट क्रमांक UK 018 च्या क्रूला विमानात बॉम्बची धमकी असलेली नोट सापडली. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रोटोकॉलचे पालन करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कळवण्यात आले आणि दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरल्यानंतर विमान अनिवार्य चाचणीसाठी ‘आयसोलेशन बे’ मध्ये नेण्यात आले.
एजन्सीच्या अहवालात असेही म्हटले आहे की प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले की आवश्यक सुरक्षा तपासणी पूर्ण करण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा तपासणीमुळे प्रवासी सुमारे 5 तास विमानतळावर अडकून पडले होते.
व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!