हिक्कीमुळे येऊ शकतो स्ट्रोक! ‘लव्ह बाईट’ घेताना सावधान; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

WhatsApp Group

Love Bite Hickey Health Risk : प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘हिक्की’ किंवा ‘लव्ह बाईट’ मुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. त्वचेवर ओठांनी जोरदार चुंबन घेतल्याने निर्माण होणारी ही काळसर जखम निरुपद्रवी वाटत असली तरी, काही प्रकरणांमध्ये ती मेंदूत रक्ताच्या गाठी (ब्लड क्लॉट) निर्माण करू शकते, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

डॉक्टरांचे मत काय?

न्यूरोलॉजिस्ट्सच्या म्हणण्यानुसार, हिक्कीमुळे त्वचेखालील रक्तवाहिन्या फुटतात आणि कधी कधी ही गाठ रक्तप्रवाहात जाऊन मेंदूपर्यंत पोहोचते, त्यामुळे इस्केमिक स्ट्रोक होण्याची शक्यता निर्माण होते.

हेही वाचा – बंगळुरूमध्ये 5000 भटक्या कुत्र्यांसाठी ‘चिकन राईस’ योजना; BBMP खर्च करणार 2.88 कोटी रुपये!

“लव्ह बाईटला हलकं घेऊ नका. ती एक ‘साइलेंट थ्रेट’ बनू शकते,” असं डॉक्टर सांगतात.

पूर्वीच्या काही धक्कादायक घटना

  • 2016 मध्ये मेक्सिकोतील एका तरुणाचा हिक्कीमुळे मेंदूतील रक्तगाठ झाल्याने मृत्यू झाला होता.
  • काही प्रकरणांमध्ये हातापायांना लकवा आणि अर्धांगवायू सारखे लक्षणेही आढळली आहेत.

हिक्कीपासून सावध राहण्याची कारणं

  • रक्तदाबाचा अचानक वाढ
  • रक्तस्राव किंवा गाठ
  • त्वचेवर तीव्र सूज किंवा वेदना
  • मेंदूत रक्तपुरवठा अडथळित होणे

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment