Electric Car : गाडी घ्यायचीय? फक्त 1 वर्ष थांबा, महिंद्रा आणतेय ‘ही’ इलेक्ट्रिक कार!

WhatsApp Group

Mahindra Electric Car : इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या मागणीमुळे कंपन्या आता एकामागून एक उत्तम इलेक्ट्रिक कार तयार करत आहेत. यामुळे, महिंद्राने आता कॉम्पॅक्ट एसयूव्ही XUV400 इलेक्ट्रिक नंतर पूर्ण आकाराची इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करण्याची तयारी केली आहे. महिंद्राची ही सर्वात लोकप्रिय XUV700 आहे. ही कार नुकतीच रोड टेस्ट दरम्यान देखील दिसली. सूत्रांनुसार, XUV 700 चा इलेक्ट्रिक अवतार 2024 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. या कारच्या लॉन्चिंगमुळे Nexon ev, Creta ev सारख्या वाहनांसाठी मोठे आव्हान असणार आहे.

मात्र, ते XUV700 या नावाने लॉन्च होणार नाही. इलेक्ट्रिक वाहनांसाठी, कंपनीने एक नवीन बॅनर तयार केला आहे ज्याखाली इ-कार विकल्या जातील. याला XUV.e असे नाव देण्यात आले असून XUV 700 च्या इलेक्ट्रिक अवतारचे नाव XUV.e8 असेल. कंपनीने वर्षभरापूर्वी ब्रिटनमधील एका कार्यक्रमादरम्यान त्याचे संकल्पना मॉडेलही प्रदर्शित केले होते.

हेही वाचा – Gold Silver Price Today : मुंबई, दिल्ली, कोलकातामध्ये सोने-चांदी स्वस्त? वाचा आजचे रेट!

XUV500 नंतर, जेव्हा कंपनीने आपला अपडेटेड प्रकार XUV700 लॉन्च केला, तेव्हा कंपनीने त्याच्या इंटीरियरवर खूप लक्ष दिले. पण आता XUV E8 चे इंटीरियर आणखी चांगले आणि फ्युच्यरिस्टिक देण्यात आले आहे. SUV E8 मध्ये तीन स्क्रीन आहेत. एक स्क्रीन ड्रायव्हरच्या डिस्प्लेसाठी आहे, तर दुसरी इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी आहे आणि तिसरी स्क्रीन प्रवाशांसाठी आहे.

फीचर्स

XUV 700 ची अनेक वैशिष्ट्ये जसे की पॅनोरामिक सनरूफ, सीटिंग लेआउट, डॅश लेआउट आणि दरवाजा ट्रिम्स नवीन इलेक्ट्रिक SUV मध्ये पुनरावृत्ती केली जातील. त्याचबरोबर काही नवीन फीचर्स देखील यात अॅडऑन असतील. कंपनीने अद्याप त्याची रेंज, स्पेसिफिकेशन आणि किंमत जाहीर केलेली नाही. असे मानले जाते की कंपनी 2024 ऑटो एक्सपो दरम्यान लॉन्च करेल आणि त्याच वेळी त्याचे बुकिंग देखील सुरू होईल. त्याच वेळी, हे 2024 च्या मध्यात किंवा शेवटी बाजारात लॉन्च केले जाऊ शकते.

महिंद्राच्या अभ्यासानुसार, सध्याच्या एसयूव्हीचे 25 टक्के खरेदीदार इलेक्ट्रिककडे वळतील. हे पाहता, कंपनी येत्या 5 वर्षात 20 ते 30 टक्के SUV लाईनअप इलेक्ट्रिक वाहन बाजारात लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment