

Medical Scheme : पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा धोका दिसून येत आहे. कोविडबाबत देशात सरकारकडून अॅडव्हायजरीही जारी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा लोकांना त्यांच्या आरोग्याची चिंता सतावू लागली आहे. दुसरीकडे केंद्र सरकारकडूनही लोकांच्या आरोग्याचा विचार करून आरोग्याशी निगडीत योजना राबवल्या जात आहेत. या योजनेत लोकांना लाखो रुपयांचे आरोग्य कवचही दिले जात आहे. चला जाणून घेऊया या योजनेबद्दल…
आयुष्मान भारत योजना
आपण आयुष्मान भारत योजनेबद्दल बोलत आहोत. आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) ही भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत लोकांना आरोग्यविषयक सुविधा पुरविल्या जातात. गरिबांना दर्जेदार आरोग्य सेवांमध्ये कॅशलेस ऍक्सेस देऊन त्यांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.
हेही वाचा – PMVVY : लग्न झालय…! विवाहितांनी घ्या ‘या’ योजनेचा लाभ, वर्षभरासाठी ५१ हजार रुपये मिळतील.
विमा संरक्षण
योजनेंतर्गत, आयुष्मान भारत नेटवर्क हॉस्पिटलमध्ये वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार मिळू शकतात. ही योजना दोन उद्दिष्टांसह सुरू करण्यात आली होती. भारतामध्ये सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी आरोग्य आणि निरोगी पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करणे आणि देशातील किमान ४० टक्के लोकसंख्येला विमा संरक्षण प्रदान करणे, जे मुख्यत्वे दुय्यम सुविधांपासून वंचित आहेत.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
सामाजिक-आर्थिक आणि जात जनगणना डेटाबेसवर आधारित सुमारे ५० कोटी लोकांना किंवा सुमारे १० कोटी कुटुंबांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हे केंद्र सरकारच्या या प्रमुख योजनेचे उद्दिष्ट आहे. आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना खूप लोकप्रिय आहे. ही योजना २०१८ साली पंतप्रधान मोदींनी सुरू केली होती. आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचे उद्दिष्ट ५ लाख रुपयांचे आरोग्य कवच प्रदान करण्याचे आहे.