Video : ‘हॅलोविन पार्टी’त मृत्यूचं तांडव..! चेंगराचेंगरीत १५० लोकांचा अंत, शेकडो जखमी

WhatsApp Group

South Korea Halloween Party Stampede : दक्षिण कोरियाची राजधानी सियोलमध्ये एक वेदनादायक अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हॅलोविन पार्टीदरम्यान चेंगराचेंगरीत किमान १५० लोक ठार झाले आणि शेकडो जखमी झाले. अनेकांवर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. हॅलोविनच्या वेळी सियोलमध्ये गर्दी होत असताना ही घटना घडली. हा जमाव एका अरुंद गल्लीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर हाणामारी होऊन चेंगराचेंगरी झाली. यापैकी ५० जणांचा मृत्यू ह्रदयविकाराचा झटक्याने झाला आहे.

या दुर्घटनेनंतर दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी एक निवेदन जारी करून लोकांवर उत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविड-१९ निर्बंध शिथिल केल्यानंतर देशातील हा सर्वात मोठा मेळावा आहे. अधिकाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार करणारे किमान ८१ कॉल आले.

हेही वाचा – बाबो..! मारुती-सुझुकीच्या ‘या’ ३ गाड्यांमध्ये प्रॉब्लेम; ९९२५ युनिट्स परत बोलावल्या!

१ लाख लोकांची गर्दी

कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर सोलमध्ये आउटडोअर नो-मास्क हॅलोविन पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत सुमारे १ लाख लोक उपस्थित होते. दक्षिण कोरियाच्या नॅशनल फायर एजन्सीचे अधिकारी चोई चेओन-सिक यांनी सांगितले की, इटावॉन लीजर जिल्ह्यात गर्दी अचानक वाढली. यादरम्यान सुमारे १५० जण जखमी झाल्याची भीती आहे. रविवारी सकाळी या लोकांना हृदयविकाराचा त्रास झाला. स्थानिक मीडियानुसार, एका सेलिब्रिटीच्या आगमनाची घोषणा करण्यात आली. या अज्ञात सेलिब्रिटीला पाहण्यासाठी लोक त्या दिशेने धावू लागले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील ४०० हून अधिक आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. या सर्व लोकांना जखमींवर उपचारासाठी तैनात करण्यात आले आहे.

काय असतो हॅलोविन सण?

हॅलोविन सण जगातील अनेक शहरांमध्ये साजरा केला जातो. विशेषतः हे सण पाश्चात्य देश साजरे करतात. पण आता तो जगाच्या इतर भागातही साजरा केला जात आहे. या उत्सवादरम्यान रात्री चंद्र नवीन अवतारात दिसतो.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment