New Labour Codes : भारतातील कामगार कायद्यांमध्ये दशकातील सर्वात मोठा बदल अखेर लागू झाला आहे. 21 नोव्हेंबरपासून नवीन ‘लेबर कोड्स 2025’ देशभरात प्रभावी झाले असून, यामुळे सांगठित आणि असंघटित क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना थेट फायदा मिळणार आहे. केंद्र सरकारने 29 जुन्या कामगार कायद्यांचे सरलीकरण करून 4 प्रमुख लेबर कोड्स लागू केले आहेत.
- कोड ऑन वेजेस 2019
- इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड 2020
- ऑक्यूपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स (OSH) कोड 2020
- सोशल सिक्युरिटी कोड 2020
या नवीन नियमांमुळे किमान वेतनाची हमी, सामाजिक सुरक्षा, वर्क फ्रॉम होम, ओव्हरटाईमचे डबल वेतन, रात्री महिला शिफ्ट, गिग वर्कर्ससाठी लाभ, ग्रॅच्युइटी फक्त 1 वर्षात असे मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.
नवीन श्रम कायद्यातील 10 महत्वाचे बदल
फिक्स्ड-टर्म कर्मचार्यांसाठी मोठा बदल
आयटी, मीडिया, मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक, सर्विस सेक्टरमध्ये एका वर्षाच्या सेवेनंतरही स्थायी सुविधांचा लाभ मिळणार. यापूर्वी किमान 5 वर्षांची अट होती. हे पाऊल नोकरीची सुरक्षा वाढवणार आणि नियोक्त्यांना लवचिकता देणार आहे.
वार्षिक पगारी रजा मिळवणे सोपे
आता पगारी रजेची पात्रता मिळवण्यासाठी 240 दिवसांऐवजी 180 दिवस काम आवश्यक. ऋतूनिर्भर आणि शिफ्ट-बेस्ड कामगार यामुळे मोठ्या प्रमाणात लाभात.
हेही वाचा – असं कुटुंब ज्यात प्रत्येकाच्या चेहऱ्याचा आकार सतत बदलतो!
स्पष्ट कामाचे तास आणि जादा कामाचा दुप्पट पगार
✔ 8 तासांचा दिवस आणि 48 तासांचा आठवडा कायम
✔ 4 दिवसांचा मोठा आठवडा किंवा 5-6 दिवसांचा सामान्य आठवडा ठेवण्याची मुभा
✔ ओव्हरटाइम स्वेच्छेनेच व दुप्पट दराने अनिवार्य
✔ राज्यांना ओव्हरटाइम मर्यादा वाढवण्याचा अधिकार
नियुक्तीपत्र देणे अनिवार्य
प्रत्येक कर्मचाऱ्याला लेखी नियुक्तीपत्र देणे आता बंधनकारक. यात वेतन, कामाचा वेळ, कामाची जबाबदारी, आणि सुविधा स्पष्ट नमूद असतील.
किमान वेतन सर्वांवर लागू
किमान वेतन आता सर्व क्षेत्रांसाठी समान आणि बंधनकारक, फक्त निवडक उद्योगांवरच नाही. केंद्र सरकार ‘राष्ट्रीय किमान वेतन’ ठरवेल आणि कोणतेही राज्य यापेक्षा कमी वेतन लागू करू शकणार नाही.
हातात मिळणाऱ्या पगारात कमी होण्याची शक्यता
नव्या नियमांनुसार PF व ग्रॅच्युइटी कपातीचा हिस्सा वाढल्याने टेक-होम सॅलरी थोडी कमी होऊ शकते, जोपर्यंत कंपनी CTC मध्ये बदल करीत नाही.
सर्व कर्मचार्यांसाठी वेळेवर वेतनाचा अधिकार
आता वेळेवर पगार ही सर्व कर्मचार्यांची हमी हक्क. उशीर झाल्यास दंडाची तरतूद लागू.
प्रवासातील अपघात आता कामाचे अपघात
घर ते कामाचे ठिकाण ये-जा करताना झालेला अपघात कामाशी संबंधित अपघात मानला जाईल, त्यामुळे भरपाई, विमा आणि ESI लाभ मिळवणे सोपे.
ESIC कव्हरेज सर्वत्र विस्तार
कामाचे ठिकाण छोटे, मोठे, धोकादायक, दुकान, कारखाना असो — ESI सुविधा आता सर्वत्र उपलब्ध. वैद्यकीय विमा, अपंगत्व सहाय्य, आणि मातृत्व लाभ वाढणार.
मीडिया, OTT, डिजिटल आणि क्रिएटिव्ह कर्मचाऱ्यांसाठी औपचारिक हक्क
पत्रकार, डबिंग आर्टिस्ट, क्रू मेंबर्स, OTT/डिजिटल कामगारांना आता औपचारिक नियुक्तीपत्र, वेतन, कामाचे तास व सुविधा लिखित स्वरूपात हमीदार.
नवीन श्रम संहितांचे एकूण महत्त्व
- कामगारांची सुरक्षा वाढणार
- वेतन व्यवस्थेतील पारदर्शकता
- कल्याणकारी सुविधांचे संरक्षण
- करार कामगारांनाही समान हक्क
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!