हॉस्पिटलच्या छतावर आढळले २०० पेक्षा जास्त मृतदेह..! Video पाहून हादराल

WhatsApp Group

Decayed Bodies On Hospital Roof In Pakistan : पाकिस्तानातील मुलतान शहरातील एका रुग्णालयाच्या छतावरून २०० हून अधिक कुजलेले मृतदेह सापडले आहेत. निश्‍तर हॉस्पिटलच्या शवागाराशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. वृत्तानुसार, रुग्णालयाच्या छतावरील एका खोलीत डझनभर मृतदेह आढळून आले. त्याचवेळी, सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या बातम्यांनुसार, रुग्णालयाच्या छतावरून शेकडो मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यातील अनेक शरीराचे अवयवही गायब आहेत. आतापर्यंत या वृत्तांना सरकारकडून पुष्टी किंवा नाकारण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी अद्याप मृतदेहांची नेमकी संख्या दिलेली नाही.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार तारिक जमान गुर्जर यांनी सांगितले की, एका माणसाने त्यांना निश्तर हॉस्पिटलच्या शवागाराच्या टेरेसवर मृतदेह कुजल्याची माहिती दिली. ते म्हणाले, ‘मी निश्तर हॉस्पिटलला भेट देण्यासाठी गेलो होतो, तेव्हा एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि म्हणाली की, तुम्हाला काही चांगलं काम करायचं असेल तर शवागारात जाऊन तपासणी करा.’

हेही वाचा – विराट कोहलीला अटक करा..! ट्विटर का ट्रेंड होतोय #ArrestKohli? इथं वाचा!

‘कर्मचारी शवागाराचा दरवाजा उघडण्यास तयार नव्हते’

गुर्जर यांनी सांगितले की, जेव्हा ते तेथे पोहोचले तेव्हा कर्मचारी शवागाराचा दरवाजा उघडण्यास तयार नव्हते. ते म्हणाले, ‘मी त्यांना धमकावले आणि सांगितले की, जर ते आता उघडले नाही तर मी तुमच्याविरुद्ध एफआयआर दाखल करेन. यानंतर त्यांनी शवागाराचा दरवाजा उघडण्यास होकार दिला. आत गेल्यावर मला जवळपास २०० मृतदेह पडलेले दिसले. त्यात पुरुष आणि स्त्रियांचेही मृतदेह होते, जे नग्न अवस्थेत होते आणि कुजत होते.

Leave a comment