पाकिस्तानच्या टॉप पेपरमध्ये मोठा घोटाळा, ChatGPT चं वाक्य अख्खं जसंच्या तसं छापलं!

WhatsApp Group

Pakistan AI journalism : इंटरनेटने जगभरातील जीवनशैलीच बदलून टाकली. त्यातही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आल्यानंतर माहिती मिळवणे आणखीन सुलभ झाले. सुईपासून विमानापर्यंत कोणतीही माहिती ‘चॅटजीपीटी’वर टाईप केली की उत्तर समोर! भारतातही अनेकजण AI चा वापर डेटासाठी करतात, पण लेखन आपलं स्वतःचं ठेवण्याची परंपरा अजून टिकली आहे.

पण पाकिस्तानमध्ये मात्र वेगळंच चित्र समोर आलं आहे. शेजारी देशातील वरिष्ठ संपादक स्वतः लेखन न करता AI वरच अवलंबून राहतात, असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा संपूर्ण वाद पाकिस्तानच्या सर्वात प्रतिष्ठित वृत्तपत्र ‘Dawn’ मधील एका मोठ्या चुकीतून उघडकीस आला.

‘Dawn’ मध्ये नेमकं काय छापलं गेलं?

‘Dawn’ हे पाकिस्तानचे सर्वाधिक प्रतिष्ठेचे आणि जुने वृत्तपत्र मानले जाते. मोहम्मद अली जिन्ना यांनी 1941 मध्ये याची सुरूवात ब्रिटिश इंडिया काळात केली होती. 12 ऑक्टोबर 1942 रोजी याचा पहिला अंक प्रकाशित झाले.

पण 12 नोव्हेंबरच्या एडिशनमध्ये ‘ऑक्टोबरमध्ये ऑटोमोबाईल विक्रीत वाढ’ या शीर्षकाच्या लेखात अशी ओळ छापली गेली, जी पाहून संपूर्ण सोशल मीडिया पेटून उठला.

लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात अक्षरशः ChatGPT चे प्रॉम्प्टमधील वाक्य जसंच्या तसं छापलं गेलं होतं, “If you want, I can also create an even snappier ‘front-page style’ version with punchy one-line stats and a bold, infographic-ready layout…”

याचा अर्थ “आपण इच्छित असल्यास मी अजून आकर्षक फ्रंट-पेज स्टाइल आवृत्ती तयार करू शकतो, प्रभावी वन-लाइन आकडे आणि इन्फोग्राफिक लेआउटसह…”

वाचकांना लगेच समजलं की हे लेखन मानवी पत्रकाराने नसून ChatGPT ने लिहिलं आहे. आणि संपादकांनी ते पडताळून पाहण्याचाही त्रास घेतलेला नाही!

हेही वाचा – माजी मंत्री आणि मुलाला 7-7 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा!

सोशल मीडियावर Dawn ची जबरदस्त खिल्ली

एडिशन छापल्या-छापल्या सोशल मीडियावर लोकांनी Dawn ची जोरदार खिल्ली उडवली.

  • “Ethics चा उपदेश देणारे Dawn स्वतः AI वर अवलंबून? काय विडंबन!”
  • “AI आता संपादकांची नोकरी खाणार हे पक्कं!”

अनेकांनी तर विनोदाने टिप्पणी केली, “AI संपूर्ण पेपरच छापणार किंवा संपादकांना उघडे पाडणार… दोन्ही परिस्थितीत नोकरी जाणारच!”

पत्रकारितेचे भविष्य धोक्यात?

या घटनेने एक मोठा प्रश्न पुन्हा चर्चेत आणला,  AI पत्रकारांची जागा घेणार का? जगभरातील माध्यमसंस्था AI चा वापर वेगाने वाढवत आहेत. पण ‘Dawn’ सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रात ChatGPT चे प्रॉम्प्ट जसंच्या तसं छापले जाणे म्हणजे संपादकीय जबाबदारीवरच प्रश्नचिन्ह आहे.

मानवी पत्रकारांची भाषा, विवेक, पडताळणी या कौशल्यांशी AI सध्या तरी तुलना नाही. पण अशा चुका सुरू राहिल्या तर भविष्यात अनेक नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment