

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या असून बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कच्च्या तेलाच्या दरात वाढ दिसून आली. ब्रेंट क्रूड आता 80 डॉलरच्या आसपास पोहोचले आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत बदल होत आहेत. आज अनेक शहरांमध्ये तेलाच्या किरकोळ किमती वाढल्या आहेत.
चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
- दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर आहे.
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.
हेही वाचा – Post Office Scheme : करोडपती व्हा..! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवा पैसे; वाचा डिटेल्स
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!