SBI ग्राहकांची चांदी..! पुन्हा सुरू झाली ‘ही’ तगडी स्कीम; 7.60 टक्क्याने मिळतं व्याज!

WhatsApp Group

SBI Amrit Kalash Fixed Deposit Scheme : स्टेट बँक ऑफ इंडियाने 12 एप्रिल ते 30 जून या कालावधीत आपल्या ग्राहकांसाठी अमृत कलश मुदत ठेव योजना पुन्हा सुरू केली आहे. ग्राहक तसेच सर्व खातेदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अमृत ​​कलश मुदत ठेव योजनेंतर्गत, तुम्ही 400 दिवसांसाठी मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करू शकता. अमृत ​​कलश मुदत ठेव योजनेत सर्वसामान्य नागरिकांना 7.10 टक्के दराने व्याज दिले जात आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर दिला जात आहे. या योजनेत नोंदणी केल्यानंतर पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या महिन्यांच्या अंतराने व्याज दिले जाते.

या योजनेवर कर्जाची सुविधा

अमृत कलश मुदत ठेव योजनेत मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. तसेच, ग्राहक या मुदत ठेवीवर देखील कर्ज घेऊ शकतो आणि आयकर कायद्यानुसार प्राप्त व्याजातून टीडीएस कापला जाईल. ही योजना दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी घरगुती किरकोळ मुदत ठेव आणि NRI मुदत ठेव दोन्हीसाठी लागू आहे. खातेदारांसाठी मुदत ठेव आणि विशेष मुदत ठेव सुविधा देखील उपलब्ध आहेत.

हेही वाचा – IPL 2023 : मराठमोळ्या केदार जाधवचं कमबॅक..! ‘या’ टीमकडून खेळणार; मिळाले ‘इतके’ पैसे!

30 जूननंतर ही योजना पुन्हा बंद

अमृत ​​कलश मुदत ठेव योजनेचा लाभ 30 जूनपर्यंत घेता येईल. त्यानंतर ही योजना बंद होईल. ही योजना ज्यांना नियमित बचत खात्यांपेक्षा जास्त व्याज मिळवून त्यांचे पैसे एका निश्चित कालावधीसाठी गुंतवायचे आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. विद्यमान खातेदारही त्यांच्या जुन्या ठेवींचे नूतनीकरण करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

स्टेट बँकेची अमृत कलश मुदत ठेव योजना यापूर्वी 15 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत सुरू होती. SBI ने अमृत कलश मुदत ठेव योजना तसेच VCare वरिष्ठ नागरिक FD योजना 30 जून 2023 पर्यंत वाढवली आहे. ही योजना पहिल्यांदा मे 2020 मध्ये सुरू झाली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment