Tantya Mama Statue Scam : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून आदिवासी समाजाचे स्वातंत्र्यसंग्राम नायक टंट्या मामा भील यांच्या नावाशी संबंधित एक खळबळजनक भ्रष्टाचार प्रकरण समोर आले आहे. येथे टंट्या मामा यांच्या पुतळ्याच्या नावाखाली 9 लाख 90 हजार रुपयांचा ठेका मंजूर करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात बसवण्यात आलेली मूर्ती ही फक्त 50 हजार रुपयांची स्वस्त फाइबर मूर्ती असल्याचा आरोप होत आहे.
कुठे घडला हा प्रकार?
हा संपूर्ण प्रकार खरगोन शहरातील बिस्टान नाका चौकात उघडकीस आला आहे. 24 सप्टेंबर 2025 रोजी नगरपालिका परिषदेकडून या चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी 40 लाख रुपयांचा बजेट मंजूर करण्यात आला होता. यामधून टंट्या मामा भील यांची नवीन मूर्ती उभारण्यासाठी 9.90 लाख रुपये स्वतंत्रपणे मंजूर करण्यात आले.
एमपी में भ्रष्टाचार 'आउट ऑफ कंट्रोल', 10 लाख लेकर 50 हजार की मूर्ति लगाने वाला ब्लैक लिस्टेड@INCMP https://t.co/1kjWuKqcOS pic.twitter.com/WCNbq30WKQ
— Patrika Madhya Pradesh (@patrika_mp) January 14, 2026
हेही वाचा – ना हालचाल, ना आवाज… 12 वर्षांची वेदना आणि आजचा अंतिम निकाल!
दगड किंवा धातूची मूर्तीची अट
महत्त्वाचे म्हणजे, जिल्हाधिकारी (कलेक्टर) स्तरावरून स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या की मूर्ती ही पक्क्या दगडाची किंवा धातूची असावी. मात्र प्रत्यक्षात चौकात उभारण्यात आलेली मूर्ती ही फाइबरची असल्याचे नंतर समोर आले. ही बाब उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.
लोकार्पणही झाले… तेही VIP उपस्थितीत
या मूर्तीचे लोकार्पण 15 नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात पार पडले.
या कार्यक्रमाला –
- आमदार बालकृष्ण पाटीदार
- जिल्हाधिकारी भाव्या मित्तल
- नगरपालिका अध्यक्ष छाया जोशी
- भाजप जिल्हाध्यक्ष नंदा ब्रह्माणे
यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे, लोकार्पणावेळी कोणालाही मूर्तीच्या दर्जाबाबत शंका आली नाही, किंवा आली तरी दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
विरोधानंतर उघडकीस आला घोटाळा
काँग्रेस नेते व स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर चौकशी झाली आणि मूर्ती धातूची नसून स्वस्त फाइबरची असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब समोर येताच जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून चौकशीचे आदेश दिले आहेत शिवाय जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले
नगरपालिका तातडीने हलली
नगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन बैठक बोलावून संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केले, जुना टेंडर रद्द करण्यात आला
ठेकेदाराची माफी आणि ‘दान’चा डाव
स्वतःवर कारवाईची टांगती तलवार पाहून ठेकेदाराने या प्रकरणात माफी मागितली असून तो फाइबरची मूर्ती दान स्वरूपात देत असल्याचे सांगत आहे. मात्र काँग्रेसने हा प्रकार म्हणजे घोटाळा झाकण्यासाठीचा डाव असल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसचा गंभीर आरोप
प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष व माजी आमदार रवि जोशी यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “9-10 लाखांच्या ठेक्याच्या बदल्यात फक्त 50 हजारांची मूर्ती बसवण्यात आली. आता अधिकारी वाचवण्यासाठी दानपत्राचा बनाव केला जात आहे. केवळ ठेकेदार नव्हे, तर तपासणी न करता मूर्ती बसवणाऱ्या अभियंते व अधिकाऱ्यांवरही FIR दाखल झाली पाहिजे.”
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा