

Top 10 SUV Under 10 Lakh : भारतात एसयूव्ही खूप लोकप्रिय होत आहेत आणि त्यांच्या विक्रीतही तेजी दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु तुमचे बजेट १० लाख रुपयांपर्यंत असेल, तर आम्ही १० लाख रुपयांपेक्षा कमी एक्स-शोरूम किंमत असलेल्या १० SUV ची यादी तयार केली आहे. या यादीत महिंद्रा थारचाही समावेश आहे. होय, Mahindra Thar RWD ची किंमत रु. ९.९९ लाख एक्स-शोरूम पासून सुरू होते.
१० लाख रुपयांच्या खाली टॉप १० SUV
- Tata Punch (किंमत – ६ लाख ते ९.४ लाख)
- Tata Nexon (किंमत – ७.८० लाख ते १४.३५ लाख)
- Maruti Brezza (किंमत – ८.१९ लाख ते रु. १३.८८ लाख)
- Hyundai Venue (किंमत – ७.६८ लाख ते १३.११ लाख)
- Kia Sonet (किंमत – ७.६९ लाख ते १४.३९ लाख)
- Renault Kiger (किंमत – ६.५० लाख ते ११.२३ लाख)
हेही वाचा – Third Party Insurance : थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय? त्याचे फायदे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- Nissan Magnite (किंमत – ५.९७ लाख ते १०.९४ लाख)
- Mahindra XUV300 (किंमत – ८.४१ लाख ते १४.०७ लाख)
- Mahindra Bolero (किंमत – ९.७८ लाख ते १०.७९ लाख)
- Mahindra Thar (किंमत – ९.९९ लाख ते १६.४९ लाख)
या किंमती एक्स शोरूम आहेत. यापैकी, महिंद्रा बोलेरो आणि थार वगळता, सर्व ५-सीटर एसयूव्ही आहेत. बोलेरो ७ सीटर आणि थार ४ सीटर आहे. तर, टाटा पंच मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमधील आहे तर उर्वरित एसयूव्ही सब ४-मीटर एसयूव्ही सेगमेंटमधील आहेत. पंच व्यतिरिक्त, इतर सर्व एसयूव्हीच्या शीर्ष प्रकारांची किंमत १० लाख रुपयांच्या वर आहे. महिंद्रा बोलेरो आणि महिंद्रा थार (ऑनरोड) या दोन्हीच्या बेस व्हेरियंटची किंमत देखील १० लाखांपेक्षा जास्त आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!