

Truck Sinks In Road : सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, जो पाहून कोणीही थक्क होईल. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, एका गजबजलेल्या रस्त्यावरून एक मोठा ट्रक येत आहे आणि त्याच्या समोरच एका लहान मुलांची सायकल उभी आहे. मात्र त्या सायकलींना वेळेत बाजूला करणारी एक जागरूक महिला या घटनेतील खऱ्या नायिकेप्रमाणे पुढे येते.
ही घटना इतकी वेगाने घडते की कोणी काही समजून घेण्याच्या आतच रस्ता अचानक धसकतो आणि ट्रकचा मागचा भाग थेट जमिनीत गडप होतो. समोरचा भाग रस्त्यावर राहतो, पण मागचं अर्धं वाहन पूर्णपणे गडगडून खड्ड्यात कोसळतं. हे दृश्य इतकं भयंकर आहे की तिथे उपस्थित नागरिक भयभीत होतात आणि सैरभैर होतात.
या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ जवळील दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो सोशल मीडियावर सध्या जोरात फिरतो आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत महिलेच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. कारण जर त्या महिलेनं सायकली बाजूला घेतल्या नसत्या, तर हे लहान मुले त्याच जागी उभी राहिली असती आणि मोठा अपघात अनिवार्य झाला असता.
Oh my God… What just happened here?!pic.twitter.com/YWv0pqX6ms
— Enezator 1 Mn (@Enezator) September 22, 2025
हेही वाचा – शनि शिंगणापूर मंदिर घोटाळ्याने हादरलं! ट्रस्ट बरखास्त, आता जिल्हाधिकाऱ्यांकडे संपूर्ण कारभार
हा अपघात केवळ रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे झाला असं स्पष्टपणे दिसून येतं. अचानक रस्त्याचा काही भाग धसकणं म्हणजेच त्या ठिकाणी पायाभूत सुविधांची अतिशय दयनीय अवस्था आहे. लोकांनी या घटनेनंतर प्रशासनावरही ताशेरे ओढले आहेत – “रस्ते इतके निकृष्ट दर्जाचे कसे काय असू शकतात?” असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
घटनेनंतर काही क्षणांतच मोठी गर्दी जमते. कोणी मोबाइलमध्ये व्हिडिओ काढायला लागतात, तर कोणी ट्रक चालकाला मदत करायला धाव घेतात. सुदैवाने ट्रकचालक सुखरूप बाहेर निघाला, परंतु ट्रकचा मागचा मोठा भाग खड्ड्यात पूर्ण गडप झाला होता.
ही घटना केवळ एक अपघात नसून एक इशारा आहे – अपुऱ्या पायाभूत सुविधा, निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि वेळेवर देखभाल न झाल्यास काय भीषण परिणाम होऊ शकतात याचं हे ज्वलंत उदाहरण. या घटनेमुळे त्या जागरूक महिलेमुळे लहान बालकांचे प्राण वाचले, ही बाब विशेष महत्त्वाची आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा