Ganesh Visarjan UK Accident : ब्रिटनमधील एसेक्स येथे गणेश विसर्जनावरून परतताना भारतीय विद्यार्थ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत हैदराबाद येथील दोन तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चैतन्य तार्रे (23) आणि ऋषितेजा रापोलू (21) यांचा समावेश आहे. दोघेही उच्च शिक्षणासाठी लंडनमध्ये आले होते.
ही दुर्दैवी घटना 1 सप्टेंबर रोजी पहाटे 4.15 वाजता एसेक्सच्या रेले स्पर राउंडअबाउटजवळ घडली. वाहनांची भीषण टक्कर झाल्यानंतर चैतन्य याचा जागीच मृत्यू झाला, तर ऋषितेजा याने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
या अपघातात जखमी झालेल्या 5 विद्यार्थ्यांवर रॉयल लंडन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यात साई गौतम रावुल्ला (30) याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. नूतन थाटिकयाला हा अपघातानंतर अंशतः पक्षाघातग्रस्त झाला आहेत. तसेच युवा तेजा रेड्डी गुर्रम, वामशी गोल्ला आणि वेंकट सुमंत पेंट्याला हे विद्यार्थीही सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
हेही वाचा –शिल्पा शेट्टीला तगडा धक्का, बंद करावे लागले बांद्र्यातील लग्झरी रेस्टॉरंट!
अपघातात सहभागी वाहनं गोपीचंद बटमेकला आणि मनोहर सब्बानी यांच्या ताब्यात होती. ब्रिटिश पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गंभीर निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू व इजा घडवणं या आरोपांखाली कारवाई केली जात आहे.
हैदराबादमध्ये ही बातमी पोहोचताच चैतन्य आणि ऋषितेजा यांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली. चैतन्यच्या कुटुंबीयांनी सांगितले की, अपघाताची माहिती आधी गंभीर जखमी असल्याची मिळाली होती, मात्र काही तासांत मृत्यूची दु:खद बातमी आली.
ऋषितेजा रापोलूचे कुटुंब बोडुप्पल येथे राहते. त्यांच्याकडूनही केंद्र व राज्य सरकारकडे विनंती करण्यात आली आहे की विद्यार्थ्यांचे मृतदेह लवकरात लवकर भारतात आणावेत जेणेकरून त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करता येतील.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा