VIDEO : भैय्या, मेरे पे भरोसा रखो…, सरफराज खानचा आत्मविश्वास पाहा; कॅच घेणाऱ्या पंतलाही कळलं नाही!

WhatsApp Group

Sarfaraz Khan Asking Rohit Sharma For DRS : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी लंच ब्रेकपूर्वी सरफराज खानच्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने भारताला विल यंगची महत्त्वाची विकेट मिळवून दिली. लंचपूर्वी न्यूझीलंडने 2 बाद 92 धावा केल्या होत्या आणि दोन्ही विकेट आर अश्विनच्या खात्यात गेल्या.

न्यूझीलंडचा बॅटर विल यंग खेळपट्टीवर स्थिरावू पाहत होता. त्याने आऊट होण्यापूर्वी 18 धावा केल्या. रवीचंद्रन अश्विनने टाकलेल्या 24व्या षटकात विल यंग यष्टीपाठी झेलबाद झाला. अश्विनने टाकलेला चेंडू विल यंगच्या लेग साईडच्या दिशेने य़ष्टीपाठी गेला आणि तो विकेटकीपर ऋषभ पंतने टिपला. तेव्हा शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या सरफराजने चेंडू बॅटची कड घेऊन गेला असल्याचे सांगितले.

हेही वाचा – Voluntary Provident Fund : 3 वर्षांनंतर सरकार EPFO बाबत करणार ‘हा’ मोठा बदल!

सरफराजने अपील केले, त्याने कॅप्टन रोहित शर्माला रिव्यू घेण्यासही सांगितले. सरफराज, विराटशिवाय इतर खेळाडू तेवढे खात्री देत नव्हते. पण सरफराजने पूर्ण आत्मविश्वासाने रोहितला रिव्यू घ्यायला सांगितला. यानंतर तिसऱ्या पंचांनी चेंडू बॅटची हलक कड घेऊन पाठी गेल्याचा निर्णय दिला. पंचांनी आऊट देताच सर्वानी सरफराजने कौतुक केले. सोशल मीडियावरही सरफराजच्या चाणाक्ष वृत्तीचे कौतुक होत आहे.

वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment