

Viral Video : मेरठमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एक तरुण चालत असताना पडला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाला आधी शिंक आली, त्यानंतर तो जमिनीवर पडला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
व्हिडिओमध्ये काय?
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांसह रस्त्यावर निघालेला एक तरुण अचानक डोके धरून खाली पडतो. डॉक्टरांनी सांगितले की, तरुणाला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. ही संपूर्ण घटना घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
हा व्हिडिओ मेरठच्या किदवाई नगरमधील अहमद नगरच्या गल्ली क्रमांक तीनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना २ डिसेंबरची आहे. रात्री १०.३० च्या सुमारास चार तरुण एकमेकांशी बोलत रस्त्यावरून जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मग अचानक नेव्ही ब्लू हुडी घातलेल्या तरुणाला आधी शिंक येते आणि नंतर डोकं धरलं. यानंतर तो घशात काहीतरी अडकल्यासारखा हात ठेवतो.
हेही वाचा – Income Tax : आयकर भरणाऱ्यांना मोठा दिलासा, आता २१ दिवसांत पूर्ण होणार ‘हे काम!
Watch : Youth collapses while returning home with friends in Meerut, dies.
A young man died while walking In Kidwai Nagar of Meerut city, Uttar Pradesh#Shocking #death pic.twitter.com/qqJ2iEnosP
— The Jamia Times (@thejamiatimes) December 5, 2022
चार पावले पुढे टाकताच तरुण रस्त्यावर पडतो. त्याच्या मित्रांना काही समजेल तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मित्रांनीही त्याला वाचवण्याचा, हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो तरुण उठू शकला नाही. त्यानंतर तेच मित्र त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. जिथे डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले.