कधी विचार केला होता का की एक दिवस आपण चष्मा घालून पेमेंट करू शकू? Lenskart करतंय!

WhatsApp Group

Lenskart Smart Glasses : भारतीय टेक जगतात पुन्हा एकदा जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे आणि यावेळी कारण आहे Lenskart! पण ही चर्चा IPOची नाही, तर एका भन्नाट शोधाची आहे. Lenskart ने नुकतंच असं काही सादर केलंय जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. नाही, हा UPI अ‍ॅप नाही… तर हा असा चष्मा आहे जो UPI पेमेंट करू शकतो!

Lenskart ने सादर केला आहे “B by Lenskart” नावाचा स्मार्ट ग्लास जो केवळ चष्मा नाही, तर एक स्मार्ट डिव्हाइस आहे ज्यातून फोटो, व्हिडिओ रेकॉर्डिंगपासून UPI ट्रान्झॅक्शनपर्यंत सगळं करता येईल.

Sony कॅमेरा आणि Snapdragon प्रोसेसरची ताकद

Lenskart चे संस्थापक आणि CEO पियुष बन्सल यांच्या मुलाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत या नव्या ग्लासची झलक पाहायला मिळाली. या “B by Lenskart” स्मार्ट ग्लासमध्ये Sony चा कॅमेरा आणि माइक बसवण्यात आलेला आहे, ज्यामुळे वापरकर्ते सहज फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात.

हा ग्लास कंपनीचा पहिला प्रयत्न नाही, याआधी Lenskart ने “Phonic 02” नावाचा ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह मॉडेल लाँच केला होता. मात्र “B by Lenskart” मध्ये घेतलेली झेप खूप मोठी आहे.

UPI पेमेंट, कॉलिंग आणि म्युझिक – सगळं एका ग्लासमध्ये

या स्मार्ट ग्लासमध्ये वापरकर्ते UPI पेमेंट करू शकतात — फक्त QR कोडकडे बघा आणि “Hello B” असा व्हॉईस कमांड द्या! Snapdragon चा AR1 प्रोसेसर (Ray-Ban Meta glasses सारखाच) या ग्लासला चालवतो, जो खास स्मार्ट चष्म्यांसाठी डिझाइन केला आहे. याशिवाय, या चष्म्यात कॉलिंग आणि म्युझिक प्लेबॅक ची सोय देखील आहे.

Google Gemini AI आणि Real-Time Translation फीचर

“B by Lenskart” मध्ये Google Gemini AI चा सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या ग्लासद्वारे AI आधारित कमांड्स, रिअल-टाइम माहिती, भाषांतर (Language Translation) आणि फिटनेस मॉनिटरिंगसारखे फिचर्स मिळतील.

कंपनी या ग्लासचे सॉफ्टवेअर डेव्हलपर्ससाठी ओपन API स्वरूपात उपलब्ध करणार आहे, म्हणजे फूड डिलिव्हरी, फिटनेस आणि एंटरटेन्मेंट अ‍ॅप्सही या चष्म्यात थेट जोडता येतील.

हेही वाचा – बार्शीचा महावीर कदम ठरला ‘फुल आयर्न मॅन’; मलेशियात 226 किमी अंतर पार करून भारताचा झेंडा फडकावला!

लाइटवेट डिझाईन आणि भविष्याची झलक

हा स्मार्ट ग्लास फक्त 40 ग्रॅम वजनाचा आहे, त्यामुळे तो दिवसभर घालूनही वापरकर्त्यांना त्रास होणार नाही. यात रिअल-टाइम भाषांतर, हेल्थ सेंसिंग आणि इतर अनेक इनोव्हेटिव्ह फिचर्स आहेत जे टेक जगतात मोठी क्रांती घडवू शकतात.

लाँच कधी होणार?

Lenskart ने अद्याप या स्मार्ट ग्लासच्या किंमती आणि उपलब्धतेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, डिसेंबर 2025 मध्ये याचे लाँच होण्याची शक्यता आहे. टेक जगतात Meta ने नुकतेच Ray-Ban Display Glasses सादर केले आहेत, आणि आता Lenskart ने भारतीय बाजारात थेट स्पर्धा उभी केली आहे. एक भारतीय कंपनी अशा पातळीवर जागतिक टेक दिग्गजांना आव्हान देताना पाहणं खरोखरच अभिमानाची बाब आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment