परेश रावल लघवी प्यायले, मानवी मूत्र आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

WhatsApp Group

Health : अभिनेते परेश रावल यांनी ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत लघवी पिण्याबद्दल सांगितले. ‘घातक’ चित्रपटात राकेश पांडे यांच्यासोबत एका दृश्याचे चित्रीकरण करताना त्यांना गुडघ्याला दुखापत झाली. यानंतर टिनू आनंद आणि डॅनी डेन्झोंगपा यांनी त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात नेले. परेश रावल खूप घाबरले होते आणि त्यांना वाटले की त्यांचे करिअर संपले आहे.

नानावटी रुग्णालयात असताना, त्यांना वीरू देवगण भेटायला गेले. त्यांनी विचारपूस केली. तेव्हा त्यांनी रावल यांनी पायाच्या दुखापतीबद्दल विचारले. त्यानंतर वीरू देवगण यांनी त्यांना काय सल्ला दिला होता ते सांगितले. त्यांनी रावल यांना सकाळी सर्वात आधी लघवी पिण्यास सांगितले. सर्व फायटर असे करतात. रावल यांना कधीही कोणतीही समस्या येणार नाही, असे देवगन यांनी सांगितले. १५ दिवसांनी रावल यांच्या शरीरात एक्स-रे रिपोर्टमध्ये पांढरा थर झाल्याचे दिसले, जे की दुखापत झाल्याचे प्रमाण होते. ही दुखापत बरी व्हायला २-२.५ महिने लागतात पण ती दीड महिन्यातच बरी झाल्याचे रावल म्हणाले.

हेही वाचा – ‘‘भारत स्वतः आपल्या लोकांना मारतो…”, पहलगाम हल्ल्याबद्दल शाहिद आफ्रिदी ‘घाणेरडं’ बरळला!

डॉक्टरांच्या मते..

जगात अनेक जण लघवी पित असले तरी अनेक डॉक्टरांच्या मते हे शरिरासाठी चांगले नाही. लघवी म्हणजे शरिरातली घाण असते. किडन्यांमध्ये काही दोष नसेल, तेव्हाच लघवी जीवाणूरहित असते. लघवी बाहेर पडताना त्यात जीवाणूंचा संसर्ग होऊ शकतो. ती प्यायल्याने तुमच्या शरिरात जीवाणू जाऊन त्याचा परिणाम होऊ शकतो. काही गंभीर आजारही होऊ शकतात.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment