गाडी सारखी-सारखी धुतली, तर तिचा रंग जातो का? जाणून घ्या उत्तर!

WhatsApp Group

Washing Car Too Much : आजच्या जगात तुम्हाला प्रत्येक घरात एक गाडी असल्याचे दिसतेच. पण किती घरांमध्ये त्याची योग्य काळजी घेतली जाते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गाडी नीट चालवणे शिवाय सोबत तिची नीट देखभाल करणे गरजेचे आहे. गाडीची काळजी घेतली तर ती वर्षानुवर्षे नवीन राहते. गाडी नवीन दिसण्यासाठी, बॉडी पेंटने तिची चमक कायम ठेवली पाहिजे. ही चमक कायम ठेवण्यासाठी अनेक वेळा लोक दररोज किंवा सातत्याने त्यांची गाडी धुतात. पण हे बरोबर आहे का? गाडी दररोज धुतल्याने तिच्या रंगावर वाईट परिणाम होणार नाही का? जाणून घ्या…

जर तुम्ही रोज गाडी धुत असाल तर काही वेळाने गाडीचा रंग हलका होऊ लागेल. गडद रंगाच्या गाडीचा रंग हलका झाला तर ती खूप घाणेरडी दिसते, त्यामुळे तुमच्याकडे कार असेल तर आठवड्यातून एकदा किंवा 10 दिवसांत धुवा. जर गाडीवर रोज धूळ साचत असेल…तर ती फक्त पाण्यानेच धुवा…रोज कार धुण्यासाठी कोणतेही केमिकल कधीही वापरू नका..

गाडी धुण्याचा योग्य मार्ग कोणता?

जेव्हाही तुम्ही तुमची गाडी धुवायला जाल तेव्हा सर्वप्रथम कोरड्या कपड्याने त्यातील घाण आणि धूळ काढून टाका. यानंतर गाडीवर पाणी टाकून हलक्या हातांनी स्वच्छ करा. तुम्ही गाडी धुण्यासाठी कोणतेही रसायन वापरू नका. गाडी धुताना कपड्याला कधीही जोरात घासू नका, असे केल्याने गाडीवर खुणा राहू शकतात, जे नंतर घाण दिसतात.

हेही वाचा –  Digital Loan : फक्त ७ मिनिटांत मिळेल लोन..! बँकांच्या चकरा मारणं होईल बंद; वाचा!

चुकूनही निरमा-साबण वापरू नका

गाडी धुण्यासाठी तुम्ही कधीही निरमा-साबण वापरू नका, असे केल्याने तुमच्या गाडीचा रंग हलका होऊ शकतो. निरमा-साबणात वापरलेली रसायने गाडीच्या रंगासाठी हानिकारक असतात, त्यामुळे गाडी धुताना चुकूनही त्याचा वापर करू नका. त्याऐवजी, तुम्हाला हवे असल्यास, कधीकधी तुम्ही गाडी धुण्यासाठी सौम्य शॅम्पू वापरू शकता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment