

Free Ration Scheme : रेशन नियम वेळोवेळी बदलले आहेत. तुम्हीही मोफत रेशनच्या सुविधेचा फायदा घेत असाल तर आता त्यात मोठा बदल करण्यात आला आहे, ज्याचा फटका यूपी-दिल्लीसह अनेक राज्यांतील शिधापत्रिकाधारकांना बसणार आहे. अनेक राज्यांमध्ये मोफत रेशन योजनेत गहू न देण्याचे सांगण्यात आले आहे, याचा अर्थ आता तुम्हाला मोफत रेशन योजनेअंतर्गत गहू मिळणे थोडे कठीण झाले आहे.
काय बदलले आहे?
सरकारने केलेल्या या बदलामागील मुख्य कारण म्हणजे गव्हाचा तुटवडा. कार्डधारकांना गव्हाऐवजी तांदूळ वितरित केले जातील, असे राज्य सरकारांनी सांगितले आहे. PMGKAY योजनेंतर्गत गव्हाच्या जागी तांदूळ वितरित केले जातील.
हा निर्णय का घेतला गेला?
याशिवाय अनेक राज्यांमध्ये शिधापत्रिकाधारकांना पूर्वीपेक्षा कमी गहू दिला जाईल आणि त्या जागी तांदूळ वाटण्यात येईल. गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गहू आणि तांदूळ मोफत दिले जातात, मात्र देशात गव्हाचा तुटवडा असल्याने अनेक राज्य सरकारांनी हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – KGF फेम ‘दिग्गज’ अभिनेत्याचे निधन; चित्रपटसृष्टीत हळहळ!
कोणत्या राज्यातील लाभार्थ्यांना गहू मिळणार नाही?
उत्तर प्रदेश, केरळ आणि बिहार या राज्यातील शिधापत्रिकाधारकांना गहू वितरित केला जाणार नाही. याशिवाय उत्तराखंड, गुजरात, झारखंड, दिल्ली, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील कार्डधारकांना पूर्वीपेक्षा कमी गहू मिळेल.
या सर्व राज्यांतील कार्डधारकांना गव्हाऐवजी अधिक तांदूळ वितरित केले जातील. याशिवाय इतर राज्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशात गव्हाची कमी खरेदी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर सुमारे ५५ लाख मेट्रिक टन अधिक तांदूळ वितरित केले जाणार आहेत.