‘असं’ नाक असेल तर तुम्ही हुशार..! जाणून घ्या नाकाच्या आकारावरून तुमचं व्यक्तिमत्त्व

WhatsApp Group

मुंबई : तुम्हाला माहीत आहे की तुमचा चेहरा पाहून तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेऊ शकता. प्रत्येक व्यक्तीचा चेहरा दुसऱ्याच्या चेहऱ्यापेक्षा वेगळा असतो हे तुमच्या लक्षात आलंच असेल. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. तुमच्या नाकाचा आकार तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काय सांगतो आणि ते कसं ओळखायचे ते या लेखात तुम्हाला कळेल.

द जर्नल ऑफ क्रॅनिओफेशियल सर्जरीच्या २०१३च्या अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीच्या नाकाचा आकार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही सांगतं. या अभ्यासासाठी, संशोधकांनी वेगवेगळ्या लोकांच्या नाकांच्या सुमारे १७०० फोटोंचा अभ्यास केला. त्यांना आढळलं की नाकाची रचना समान असलेल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये समानता आढळली. नाकाच्या रचनेच्या आधारे व्यक्तिमत्व कसं ओळखता येतं, ते जाणून घेऊया.

लांब नाक : या अभ्यासानुसार ज्यांचे नाक लांब असतं, त्यांना मेहनती मानलं जातं. अशा लोकांना प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता आवडते. हे लोक त्यांच्या व्यावसायिक आयुष्याला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापुढं ठेवतात.

लहान नाक: अभ्यासानुसार, ज्या लोकांचं नाक लहान असतं, ते संवेदनशील असतात. लोकांच्या भावना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. असे लोक करिअरच्या आधी कुटुंब ठेवतात.

टोकदार नाक: ज्या लोकांचं नाक टोकदार असं ते आर्थिक सल्ला देण्यात चांगले असतात. या लोकांना त्यांच्या पैशांचं व्यवस्थापन कसं करावं हे चांगलं माहीत आहे.

सरळ ग्रीक नाक : ज्या लोकांचं नाक सरळ असतं, असे लोक बुद्धिमान असतात. असे लोक विश्वासार्ह असतात.

बटण नाक : अशा प्रकारचं नाक असलेले लोक खूप काळजी घेणारे असतात. हे लोक वाईट परिस्थितीत पॉझिटिव्ह राहतात आणि असे लोक खूप भावनिक असतात.

चपटं नाक : अशा प्रकारचं नाक असणारे लोक स्वभावानं चांगले असतात, पण पुढच्या क्षणी त्यांचा मूड कसा असेल यावर काहीच सांगता येत नाही. कोणताही निर्णय ते विचारपूर्वक घेतात. इतर लोक त्वरीत त्यांच्याद्वारे प्रभावित होतात. ते खूप प्रामाणिक देखील असतात.

वाकडं नाक – या आकाराचं नाक असणारे त्यांच्या जीवनाचा मार्ग स्वतः ठरवतात. कोणाच्याही नेतृत्वाखाली काम करणं त्यांना आवडत नाही. ते स्वतःचे निर्णय घेतात आणि चुका करतात. ते खूप हट्टी असतात आणि इतर काय विचार करतात याची त्यांना पर्वा नसते.

तर मग बघा तुमचं नाक कसं आहे आणि तुमचं व्यक्तिमत्त्व काय सांगतं!

Leave a comment