Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, वाचा पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today : सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. यामुळे ब्रेंट क्रूडची किंमत $१.७८ किंवा २.०८ टक्क्यांनी वाढून $८७.३५ वर पोहोचली आहे, तर WTI क्रूडची किंमत $१.६५ किंवा २.०६ टक्क्यांनी वाढून $८१.६३ वर पोहोचली आहे.

अलीकडच्या काळात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराचा परिणाम भारतात दिसला नाही. आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर तेल कंपन्यांनी जाहीर केले आहेत. दरात कोणताही बदल झालेला नाही आणि प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) स्थिर आहेत. मात्र, काही शहरांमध्ये वाहतूक आणि इतर कारणांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थोडा बदल करण्यात आला आहे.

प्रमुख महानगरांनमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर

मोठ्या महानगरांबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल ८९.६२ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोल १०६.३१०रुपये आणि डिझे ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे.

हेही वाचा – Horoscope Today : कर्क सोबत ‘या’ राशीच्या लोकांसाठी दिवस आव्हानांनी भरलेला, वाचा आजचे…

दररोज दर अपडेट केले जातात

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी केले जातात. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे कर, मालवाहतूक खर्च आणि डीलर कमिशन यांचा समावेश आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत अशा प्रकारे तपासा

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत फक्त एका एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, यासाठी तुम्हाला RSP<space>डीलर कोड ९२२४९ ९२२४९ वर एसएमएस करावा लागेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment