Petrol Diesel Price Today : टाकी भरण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तपासा!

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज थोडीशी घसरण झाली असली तरी भारतात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जागतिक बाजारात डब्ल्यूटीआय क्रूड ०.२७ टक्क्यांनी घसरून $७२.९६ प्रति बॅरल, तर ब्रेंट क्रूड ०.३१ टक्क्यांनी घसरून $७६.७७ वर आले.

आजचा पेट्रोल आणि डिझेलचा दर

देशातील बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील चार महानगरांबद्दल बोलायचे झाले तर आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. चारही महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर असे आहेत.

दिल्लीत आज पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लीटर विकले जात आहे.

मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

कोलकातामध्ये पेट्रोल १०७.२४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लीटर आहे.

तर चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लीटर आहे.

हेही वाचा – Tatkal Waiting List Fare Return Policy : तत्काळ तिकीट कन्फर्म न झाल्यास पैसे परत मिळतात का? जाणून…

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

तुम्हालाही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही तुमच्या फोनवरून एसएमएस पाठवून जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कोडसह संदेश पाठवावा लागेल. इंडियन ऑइलच्या ग्राहकांना त्यांच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी RSP सोबत डीलर कोड लिहून ९२२४९९२२४९ वर एसएमएस पाठवावा लागेल. तर HPCL ग्राहकांना HPPRICE ९२२२२०११२२ क्रमांकावर पाठवावा लागेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment