Petrol Diesel Price Today : सरकारी तेल कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. या किंमती जागतिक कच्च्या तेलाच्या म्हणजेच ब्रेंट क्रूडच्या दराच्या आधारावर ठरवल्या जातात. या किमतींमध्ये विविध प्रकारचे कर आणि कमिशन देखील समाविष्ट आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यात त्याच्या किमतीत बदल होताना दिसत आहेत.
देशभरात वर्षभरापासून त्यांच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $90.53 आणि WTI क्रूडचा दर $90.74 वर पोहोचला आहे.
दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today)
दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 92.76 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि एक लिटर डिझेल 94.27 रुपये आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
इतर शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर
नोएडा : पेट्रोल 97.00 रुपये आणि डिझेल 90.14 रुपये प्रति लिटर
बेंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
हेही वाचा – MHADA Lottery : म्हाडाच्या 5,309 घरांसाठी जाहीरात, जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा!
पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे तपासायचे
जर तुम्ही शहराबाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्यांच्या किंमती तपासल्या पाहिजेत. तुम्ही त्यांच्या किमती मेसेजद्वारे किंवा अॅप्सद्वारे देखील तपासू शकता. इंडियन ऑइल अॅप्सद्वारे तुम्ही कोणत्याही शहराचे नवीन दर देखील जाणून घेऊ शकता. याशिवाय इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 वर डीलर कोड RSP पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!