

Petrol Diesel Price Today : गेल्या अनेक महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या बदलाचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात होतो. आगामी काळात हिमाचल आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत थोडा बदल होण्याची शक्यता आहे. दररोज सकाळी ६ वाजता देशातील तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. काही बदल असल्यास ते वेबसाइटवर अपडेट केले जातात. २२ मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर किती आहेत-
दिल्ली- पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
मुंबई – पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
कोलकाता- पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
हेही वाचा – Abdul Sattar : अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंना ‘शिवी’! अमोल कोल्हे म्हणाले, “नीच…”
याप्रमाणे तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घ्या
तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. यासाठी तेल विपणन कंपन्यांनी टोल फ्री क्रमांक शेअर केला आहे. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर 9224992249 या क्रमांकावर RSP लिहून आणि तुम्ही BPCL चे ग्राहक असाल तर RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर एसएमएस करून तुमच्या शहराच्या पेट्रोल आणि डिझेलची माहिती मिळवू शकता. याशिवाय HPCL चे ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPPRICE लिहून देखील जाणून घेऊ शकतात.
तेल विपणन कंपन्या किंमती जारी करतात
दररोज ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या जातात. तसे, नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होणार आहेत. एवढेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!