Rakshabandhan : ‘ही’ आहे देशातील सर्वात महागडी राखी..! किंमत ऐकली तर म्हणाल, “तिजोरीतच ठेवली पाहिजे”

WhatsApp Group

Rakshabandhan : हिंदू सणांमध्ये रक्षाबंधन (Rakshabandhan 2022) या सणाला विशेष महत्त्व आहे. यावर्षी हा सण ११ ऑगस्ट म्हणजेच उद्या साजरा केला जाईल. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हाताला राखी बांधतात आणि त्याला खूप आशीर्वाद देतात. यासोबतच भाऊ आपल्या बहिणीचं आयुष्यभर संरक्षण करण्याचं वचन देतो. राखीचा सण जसजसा जवळ येतो तसतसा बाजार रंगीबेरंगी राख्यांनी भरून जातो. २० रुपयांपासून ते हजारो रुपयांच्या राखी बाजारात विकल्या जात आहेत, पण तुम्हाला माहीत आहे का सर्वात महागड्या राखीची किंमत काय आहे?

महागडी राखी!

भारतातील सर्वात महागडी राखी गुजरातमधील सुरत शहरात विकली जात आहे. या राखीची किंमत ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. या राखीची किंमत ५ लाख रुपये आहे. ही राखी सोनं, हिरे, प्लॅटिनमपासून बनवली आहे. ही राखी दागिन्यासारखी दिसत असून तिची किंमत आणि सौंदर्य चर्चेचं केंद्र राहिलं आहे.

हेही वाचा – ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत भाग घ्यायचाय? घरबसल्या मिळेल सर्टिफिकेट; ‘असं’ करा डाऊनलोड!

सुरतमध्ये अनेक महागड्या राख्या…

सुरतमधील या ज्वेलरी शॉपमध्ये हजारो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत राख्यांची विक्री होत आहे. यामध्ये पाच लाख रुपयांपर्यंतच्या राखीचाही समावेश आहे. पाच लाख रुपयांची राखी बनवण्यासाठी सोनं, प्लॅटिनम, हिरे अशा अनेक महागड्या धातूंचा वापर करण्यात आला आहे.

Rakshabandhan most expensive rakhi in the country check the price
देशातील सर्वात महागडी राखी

 

या राखीची किंमत देशभर चर्चेचा केंद्रबिंदू राहिली आहे. यासोबतच सुरतमधील या ज्वेलरी शॉपमध्ये इतरही अनेक प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. ही राखी सोन्या-चांदीनं बनवली जाते. ज्वेलरी शॉपचे मालक दीपक भाई चोक्सी यांनी एएनआयला सांगितलं, की भाऊ सामान्य दिवसांमध्ये ही राखी दागिने म्हणून वापरू शकतात. यासोबतच येथे ४०० ते ५ लाख रुपयांच्या राख्या विकल्या जात असल्याचं दुकान मालकानं सांगितलं.
सण साजरे करण्याची पद्धत बदलतेय!

हेही वाचा – ‘बिझनेस माइंडेड’ अभिनेते प्रदीप पटवर्धन आपल्याच नाटकाची तिकिटं ब्लॅकनं विकायचे?

एक काळ असा होता जेव्हा भारतातील बहिणी आपल्या भावाच्या मनगटाभोवती रेशमी धागा बांधून राखीचा सण साजरा करत असत, पण बदलत्या काळानुसार या सणाचा अर्थही बदलला आहे. आता बाजारात अनेक प्रकारच्या फॅन्सी राख्या उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे. यासोबतच या सणात भाऊ बहिणींना भेटवस्तू देण्याच्या पद्धतीतही मोठे बदल झाले आहेत.

तारखेबाबत संभ्रम

यावेळी रक्षाबंधनाच्या तारखेबाबत संभ्रम आहे. काही पंचांग ११ ऑगस्टला तर काही १२ ऑगस्टला रक्षाबंधन साजरं करण्याविषयी सांगत आहेत. परंपरेनुसार, राखीचा सण म्हणजेच रक्षाबंधन हा श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यावेळी ११ ऑगस्ट रोजी सावन पौर्णिमा येत आहे. पौर्णिमा तिथी सकाळी १०.३८ पासून सुरू होईल आणि १२ ऑगस्ट रोजी सकाळी ७.०६ वाजता समाप्त होईल.

Leave a comment