सावधान! अ‍ॅसिडिटीच्या गोळीत ‘कॅन्सरजन्य’ रसायन! भारतात चौकशीचे आदेश जारी

WhatsApp Group

Ranitidine Cancer Risk : अ‍ॅसिडिटी आणि अल्सरवर वापरल्या जाणारे प्रसिद्ध औषध ‘रॅनिटिडीन’मध्ये (Ranitidine) कॅन्सरकारक घटक सापडल्याने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या औषधात NDMA (N-Nitrosodimethylamine) नावाचा संभाव्य कॅन्सर निर्माण करणारे रसायन आढळल्याने CDSCO आणि DCGI कडून तातडीने तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.

CDSCO (सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन) ने सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत की, रॅनिटिडीनची API आणि तयार औषध दोन्हीमध्ये NDMA कितपत आहे, याची सखोल चौकशी करण्यात यावी. यासोबतच या औषधाची शेल्फ लाइफ कमी करण्याचाही विचार करण्यात येतोय.

ड्रग्स टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी बोर्ड (DTAB) च्या शिफारशीनुसार, सरकार एक विशेष तज्ज्ञ समिती स्थापन करणार असून, ती रॅनिटिडीन तयार करताना NDMA कसा तयार होतो, याचा सखोल अभ्यास करणार आहे.

हेही वाचा –14 हजार पुरुषांनी खाल्ला ‘लाडकी बहीण’ योजनेचा पैसा, 26 लाख लोकांनी सरकारला फसवलं!

ICMR करणार दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास

ICMR (इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) ला हे औषध दीर्घकाळ वापरल्यास होणाऱ्या परिणामांवर अभ्यास करण्यास सांगण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनी रॅनिटिडीनला Group 2A Carcinogen म्हणून वर्गीकृत केलं आहे – म्हणजेच हे औषध माणसांमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता निर्माण करतं. AIIMS दिल्लीचे ऑन्कोलॉजिस्ट यांनी स्पष्ट केलं की, “जेव्हा फॅमोटिडीन आणि पॅंटोप्राझोलसारखे सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत, तेव्हा रॅनिटिडीन वापरणं टाळावं.”

काय आहे पुढचा निर्णय?

DGCI ने औषध कंपन्यांना पुढील सूचना दिल्या आहेत:

  • औषधाची शेल्फ लाइफ कमी करणे
  • साठवणूक शर्ती बदलणे
  • सप्लाय चेनमध्ये NDMA टेस्टिंग अनिवार्य करणे

अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये हे औषध आधीच बंद करण्यात आलं आहे. आता भारत सरकारही रॅनिटिडीनच्या वापरावर कठोर उपाययोजना करत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment