Stroke Exoskeleton : नॉर्वेमध्ये संशोधकांनी असा एक क्रांतिकारक शोध लावला आहे, जो स्ट्रोकमुळे हाताची हालचाल गमावलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. हा शोध आहे पूर्ण हातासाठी बनवलेला जगातील पहिलाच एक्सोस्केलेटन, जो खांदा, कोपर आणि तळहात, संपूर्ण हाताला हालचाल करण्यास मदत करतो.
हा रोबोटिक हात रुग्णाच्या अगदी सूक्ष्म हालचाली ओळखतो आणि त्या हालचालींना वाढवतो. त्यामुळे जो हात आधी जवळजवळ निकामी झाला होता, तो पुन्हा वापरण्यायोग्य बनतो.
स्ट्रोकनंतर आयुष्य कोसळलं… पण या रोबोटिक हातामुळे पुन्हा मिळाली ओळख
2017 मध्ये जोहाने मारी हेम्नेस या महिलेचा स्ट्रोक झाला आणि तिच्या शरीराचा डावा भाग पूर्णपणे पक्षाघातग्रस्त झाला. चालण्यासाठी तिच्या पायावर उपचार झाले, पण हात मात्र पूर्णपणे निष्क्रिय राहिला.
The VilPower exoskeleton by Vilje Bionics really got me thinking.Watching someone regain arm movement thanks to this kind of technology isn’t just inspiring — it’s a reminder of what innovation can do when it’s truly human-centered. This isn’t just progress, it’s hope.#ぐるナイ pic.twitter.com/jtBYgBom0x
— Two Energy News (@JoseVega___) April 3, 2025
ती सांगते, “माझ्या हाताचं नाव मी जेननी ठेवलं, कारण तो माझाच वाटत नव्हता. पण हा एक्सोस्केलेटन हात लावल्यानंतर पुन्हा वाटतं. हा हात माझाच आहे… मी पुन्हा मी झाले आहे!”
Vilje Bionics चा क्रांतिकारक शोध
ही तंत्रज्ञान विकसित केलं आहे Vilje Bionics या नॉर्वेजियन कंपनीने. अनेक भाग 3D प्रिंटेड आहेत आणि हे तंत्रज्ञान रुग्ण हात हलवायचा विचार करतो. त्याक्षणी सूक्ष्म हालचाल पकडून ती वाढवते. म्हणजेच मनात विचार केला आणि हात हलला!
आत्तापर्यंत 40 रुग्णांनी हा एक्सोस्केलेटन वापरून पाहिला आहे. 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांत हा पूर्णपणे बाजारात येण्याची शक्यता आहे.
फक्त पुनर्वसन नाही… स्वावलंबन हीच मुख्य लक्ष्य!
कंपनीचा उद्देश आहे, दीर्घकालीन अपंगत्व असलेल्या रुग्णांना पुन्हा स्वतंत्र बनवणे. भविष्यात हे रुग्णालयीन पुनर्वसनातही वापरले जाऊ शकते.
स्ट्रोक किती गंभीर?
जगातील प्रत्येक 4 पैकी 1 व्यक्तीला आयुष्यात कधीतरी स्ट्रोक होतो. अशा परिस्थितीत हे तंत्रज्ञान लाखो लोकांसाठी जीवन बदलू शकतं.
जोहाने आता पुन्हा करू शकते…
✔ भाज्या कापणे
✔ बॉटल उघडणे
✔ दैनंदिन कामे
म्हणजेच स्वतःचं जीवन स्वतः जगण्याची ताकद!
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा