

Maharashtra Banjara Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा संघर्ष शिगेला पोहोचत असतानाच आता बंजारा समाजाकडूनही आरक्षणासाठी तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाने एक दुःखद वळण घेतले असून धाराशिव जिल्ह्यातील मुरुम येथील नाइकनगरमधील 32 वर्षीय युवक पवन गोपीचंद चव्हाण याने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली आहे.
पवन याने दोन दिवस जालना येथे बंजारा आरक्षण आंदोलनात भाग घेतला होता. घरी परतल्यानंतर त्याने आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरात बांबूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हैदराबाद गॅझेटचा उल्लेख सुसाइड नोटमध्ये
घटनास्थळी पोहोचलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपन दहीफळे यांना मृतकाच्या खिशात एक सुसाइड नोट आढळून आली. या चिठ्ठीत पवनने स्पष्ट लिहिले होते की, “हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या (ST) प्रवर्गात आरक्षण मिळावे.” या आत्महत्येमुळे बंजारा समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
हेही वाचा – भारत-पाकिस्तान मॅचविरोधात महाराष्ट्रभर हल्लाबोल, उद्धव ठाकरेंची घोषणा!
पवनने लातूरमधील शाहू कॉलेजमधून बी.कॉम पर्यंतचे शिक्षण घेतले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो बेरोजगार होता. त्याच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. या घटनेने कुटुंब उघड्यावर आले आहे.
राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया
ही घटना उघड होताच बंजारा समाजातील अनेक नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी पवनच्या आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी करून बंजारा समाजाला ST प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
या घटनेने आरक्षणासाठी चाललेल्या संघर्षात एक वेदनादायी आणि गंभीर वळण दिले आहे. केवळ आरक्षणाच्या आशेवर एक शिक्षित युवक आपले जीवन संपवतो, ही बाब शासन आणि समाज दोघांसाठीही अंतर्मुख करणारी आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा