

Bharat Bandh : आज देशभरातील अनेक कामगार आणि शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ चं आवाहन केलं आहे. या व्यापक आंदोलनात २५ कोटींपेक्षा अधिक कामगार सहभागी होणार असल्याचा दावा आहे.
कामगार संघटनांचा आरोप आहे की केंद्र सरकारच्या मजुरविरोधी, शेतकऱ्यांविरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक धोरणांमुळे ते निषेध करत आहेत. या बंदचे आयोजन १० प्रमुख केंद्रीय ट्रेड युनियन्सच्या संयुक्त व्यासपीठावरून करण्यात आले आहे, ज्याला शेतकरी आणि ग्रामीण मजूर संघटनांचा ही पाठिंबा आहे.
#BharatBandh: Streets wear a deserted at MG Road in Thiruvananthapuram city in #Kerala on Wednesday morning#Strike #bandh
— The Hindu – Kerala (@THKerala) July 9, 2025
📸 @nirmalharindran pic.twitter.com/tEX8xmCUV4
कोणकोणत्या सेवा ठप्प होण्याची शक्यता?
- बँकिंग आणि विमा सेवा
- डाक आणि पोस्ट ऑफिस सेवा
- कोळसा खाणकाम आणि औद्योगिक उत्पादन
- राज्य परिवहन सेवा (ST, बस)
- सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या
- गावात शेतकरी मोर्चे आणि आंदोलने
काय सुरू राहील?
- शाळा आणि महाविद्यालये
- खाजगी ऑफिसेस (Private Offices)
- रेल्वे सेवा (परंतु उशीर होण्याची शक्यता)
संघटनांचं म्हणणं काय आहे?
AITUC (ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस) च्या अमरजीत कौर यांनी सांगितलं की, “सरकार आमच्या १७ सूत्री मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. गेल्या १० वर्षांत एकही राष्ट्रीय श्रम परिषद बोलावली नाही.” HMS (हिंद मजदूर सभा) चे हरभजन सिंह सिद्धू म्हणाले, “बँक, पोस्ट, कोळसा, राज्य परिवहन आणि फॅक्टरीमधील कामगार आंदोलनात सहभागी होतील.” AIBEA (ऑल इंडिया बँक इम्प्लॉइज असोसिएशन) च्या बॅंक कर्मचारी संघटनेने याची पुष्टी केली आहे की बँकिंग आणि विमा क्षेत्रही हडतालीत भाग घेणार आहेत. शाखा आणि एटीएम सेवांवर परिणाम होऊ शकतो.
वोटबंदी की सरकार उखाड़ फेंकेगा बिहार
— Krishna Allavaru (@Allavaru) July 9, 2025
शंखनाद हो गया जनता सड़क पर उतर गई#BharatBandh pic.twitter.com/HUdIP8LQmc
वीज सेवा धोक्यात?
वीज क्षेत्रातील २७ लाखांहून अधिक कर्मचारी या आंदोलनात सामील होऊ शकतात. त्यामुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
रेल्वे विभागाकडून आंदोलनाबाबत कोणताही अधिकृत नोटीस नाही, पण विलंब किंवा अडथळ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा – रील बनवण्याच्या नशेत बापाने घातला मुलीचा जीव धोक्यात! धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल
आंदोलनाचा व्याप – औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही क्षेत्रांमध्ये!
हा निषेध केवळ औपचारिक क्षेत्रापुरताच मर्यादित नाही. SEWA (Self Employed Women’s Association), ग्रामीण शेतकरी संघटना, आणि संयुक्त किसान मोर्चा यांसारख्या अनेक अनौपचारिक क्षेत्रातील संघटनांनीही आंदोलनात भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे, NMDC लिमिटेड, स्टील प्लांट्स सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारीही आंदोलनात सामील झाले आहेत.
यात सहभागी असलेल्या प्रमुख संघटना
- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC)
- इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC)
- सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU)
- हिंद मजदूर सभा (HMS)
- सेल्फ-एम्प्लॉयड वुमेन्स असोसिएशन (SEWA)
- लेबर प्रोग्रेसिव फेडरेशन (LPF)
- युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस (UTUC)
समर्थक संघटना
संयुक्त किसान मोर्चा, ग्रामीण मजूर युनियन, NMDC, स्टील, रेल्वे कर्मचारी संघटना
Bandh like situation in Tripura#BharatBandh #July9th #Strike #StrikeHard pic.twitter.com/hAfWQnJQEc
— CPI (M) (@cpimspeak) July 9, 2025
आंदोलनाचा मुख्य मुद्दा
संघटनांचं म्हणणं आहे की केंद्र सरकारने लागू केलेल्या चार नवीन श्रम संहितांमुळे कामगारांचे हक्क, सुरक्षा, वेतन आणि संप/हडताल करण्याचा अधिकार धोक्यात आला आहे.
मुख्य तक्रारी
- कामाचे तास वाढवले जात आहेत
- कंत्राटी कामगारांवर विसंबून असलेली धोरणं
- सरकारची कामगार परिषद न बोलावणं
- खासगीकरण आणि कॉर्पोरेट हस्तक्षेप
याआधीही देशव्यापी आंदोलन
या अगोदरही २०२०, २०२२ आणि २०२४ मध्ये अशाच स्वरूपाचे देशव्यापी कामगार आंदोलन झाले होते, ज्यात लाखो मजूर रस्त्यावर उतरले होते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!