नवी मुंबई विमानतळावरून प्रवास करायचाय? प्रवाशांनी नक्की वाचा महत्वाच्या सूचना!

WhatsApp Group

Navi Mumbai International Airport : मुंबईकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) आता अधिकृतपणे प्रवाशांसाठी खुला झाला असून, मुंबई महानगर प्रदेशाला दुसरे हवाईद्वार मिळाले आहे. यामुळे विद्यमान मुंबई विमानतळावरील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

पहिल्या दिवशी IndiGo, Air India Express, Akasa Air आणि Star Air या चार विमानकंपन्यांनी जवळपास 30 देशांतर्गत उड्डाणे सुरू केली आहेत. पहिलं विमान बंगळुरूहून सकाळी 8 वाजता नवी मुंबईत दाखल झाले, तर पहिली प्रस्थान करणारी फ्लाइटही हैदराबादसाठी IndiGo चीच होती.

मुंबईतून NMIA पर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो?

शहरातील विविध भागांतून विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी अंदाजे प्रवास वेळ असा आहे:

• पवई (Eastern Suburbs) – 34 किमी – साधारण 70 मिनिटे
• ठाणे (Viviana Mall परिसर) – 34 किमी – साधारण 60 मिनिटे
• वरळी (Island City) – 35 किमी – साधारण 70 मिनिटे
• मीरा रोड – 50 किमी – साधारण 135 मिनिटे
• गोरगाव (Western Suburbs) – 45 किमी – साधारण 95 मिनिटे
• वाशी – 14 किमी – साधारण 30 मिनिटे
• कल्याण-डोंबिवली-अंबरनाथ – 37 किमी – साधारण 120 मिनिटे

ऐरोली–बेलापूर परिसरातील प्रवाशांना थेट Thane-Belapur रोड किंवा Palm Beach रोडचा फायदा मिळणार आहे. तर खारघर आणि पनवेलहून येणारे प्रवासी Sion-Panvel रोडमार्गे NMIA ला सहज पोहोचू शकतात.

पश्चिम उपनगरातील प्रवासी मात्र, स्वस्त भाडे किंवा जलद कनेक्टिव्हिटी मिळाल्यासच नवी मुंबई विमानतळ निवडतील अशी शक्यता व्यक्त होते.

हेही वाचा – भीषण बस अपघात, झोपेत असताना जळून ९ जणांचा मृत्यू; ड्रायव्हर म्हणाला, “काय झालं काही आठवतच नाही…”

नवी मुंबई विमानतळावर किती धावपट्ट्या?

सध्या NMIA वर 2 समांतर धावपट्ट्या नियोजित असून भविष्यात हा आकडा 4 धावपट्ट्यांपर्यंत वाढवण्याची योजना आहे. यामुळे मुंबईतील प्रमुख विमानतळावरील ताण लक्षणीय कमी होईल.

पहिल्या दिवशी किती फ्लाइट्स?

पहिल्या टप्प्यात सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत उड्डाणे सुरू राहतील. सुरुवातीला 15 फ्लाइट्स 9 शहरांना जोडणार असून पुढे हे प्रमाण 24 उड्डाणांपर्यंत वाढवले जाईल. दर तासाला 10 विमानांची ये-जा हाताळण्याची क्षमता आहे. फेब्रुवारी 2026 पर्यंत 24×7 ऑपरेशन्स सुरू करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला आहे.

प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा

विमानतळावर प्रवाशांसाठी Digi-Yatra आधारित कॉन्टॅक्टलेस प्रोसेसिंग, तसेच पारंपरिक काउंटर व्यवस्था उपलब्ध आहे.
टर्मिनलमधील रिटेल व फूड-कोर्ट्स किफायतशीर ठेवण्यात आल्या असून स्थानिक चवीलाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

मोठी क्षमता, भव्य इन्फ्रास्ट्रक्चर

पहिल्या टप्प्यात Terminal-1 आणि एक धावपट्टी कार्यान्वित करण्यात आली आहे. या टर्मिनलची वार्षिक क्षमता 20 मिलियन प्रवाशी इतकी आहे, शिवाय आणखी 2-3 मिलियन प्रवाशांना हाताळण्याचीही तयारी आहे. विमानतळ दक्षिण व उत्तर मुंबईपासून 35-50 किमी आणि पूर्व उपनगरांपासून सुमारे 35-45 किमी अंतरावर आहे.

मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी! पण…

नवी मुंबई विमानतळामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, तिकीट दरांमध्ये स्पर्धा वाढेल, गर्दीत मोठी घट होईल. मात्र, पश्चिम उपनगरातील प्रवाशांनी खर्च-वेळ यांचा विचार करूनच विमानतळाची निवड करावी, असे तज्ञ सुचवतात.

NMIA हे ‘गेमचेंजर’ ठरणार का?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भविष्यात 4 धावपट्ट्या, अधिक उड्डाणे, आधुनिक सुविधा आणि जलद कनेक्टिव्हिटीसह मुंबईला जागतिक विमान वाहतुकीत आणखी बळकटी देईल, अशी अपेक्षा आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment