VIDEO : ‘गोल टोपी’, ‘हिरवे साप’ आणि ‘हिंदू डीएनए’..; नितेश राणेंच्या एका वक्तव्याने पेटली नवी वादाची ठिणगी!

WhatsApp Group

Nitesh Rane Controversial Statement On Muslims : महाराष्ट्र सरकारमधील भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून राजकीय वातावरण तापवले आहे. अल्पसंख्याक समुदायाबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याने त्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे.

‘…ते हिरवे साप आहेत’

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नितेश राणे म्हणाले, “गोल टोपी आणि दाढीवाल्यांनी मला मत दिलं नाही. मी हिंदूंमुळे आमदार झालो आणि मंत्री झालो. जर मी हिंदूंना पाठिंबा देणार नाही, तर काय उर्दू बोलणाऱ्यांना देईन का? ते हिरवे साप आहेत. मुंबईचा डीएनए हिंदू आहे.”

त्यांच्या या वक्तव्यात त्यांनी अप्रत्यक्षपणे मुस्लिम समाजाला लक्ष्य केल्याचा आरोप होत आहे.

हेही वाचा – पाच चेंडू, पाच विकेट्स! आयरिश खेळाडूने क्रिकेटमध्ये घडवला अशक्य वाटणारा इतिहास! पाहा Video

ठाकरे बंधूंवरही घणाघात

राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत, त्यांची तुलना जिहादी संघटनांशी केली. त्यांनी म्हटले की, “जे जिहादी समाज फोडतात, तेच ठाकरे बंधू करत आहेत. त्यांच्या वरळीतील सभेला PFI, SIMI आणि AIMIM रॅलीप्रमाणेच रंग होता.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment