आजपासून तत्काळ तिकिटांच्या वेळेमध्ये बदल? तुम्हालाही आलाय व्हायरल मेसेज?

WhatsApp Group

Tatkal Ticket Booking : तत्काळ तिकिटांमध्ये सुरू असलेल्या फसवणुकीच्या दरम्यान, आणखी एक बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. सध्या सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे ज्यामध्ये दावा केला जात आहे की तत्काळ तिकीट बुकिंगचे काही नियम बदलले जातील. तथापि, आयआरसीटीसीने आता यावर स्पष्टीकरण दिले आहे. व्हायरल बातम्यांमध्ये असा दावा केला जात आहे की, तत्काळ तिकिटांमध्ये मोठे बदल होणार आहेत. या बातमीनुसार, भारतीय रेल्वे १५ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून तत्काळ रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल करणार आहे.

व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की १५ एप्रिल २०२५ पासून तत्काळ तिकिट बुकिंगची वेळ बदलली जाईल. दाव्यानुसार, एसी आणि नॉन-एसी क्लाससाठी वेगवेगळे वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत आणि प्रीमियम तत्काळ तिकिटांच्या वेळा देखील बदलण्यात आल्या आहेत. काही पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की एजंटांकडून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी हा बदल करण्यात येत आहे.

प्रीमियम तत्काळ तिकिटांच्या बुकिंग वेळेत बदल होईल आणि प्रवाशांना नवीन प्रणालीचे पालन करावे लागेल असा दावाही केला जात आहे. या बातमीमुळे लाखो रेल्वे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. पण आता भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसीने या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली आहे.

सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांमध्ये असे म्हटले जात आहे की भारतीय रेल्वे १५ एप्रिल २०२५ पासून म्हणजेच आजपासून तत्काळ ट्रेन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल करणार आहे. प्रीमियम तत्काळ तिकिटांच्या बुकिंग वेळेत बदल होईल आणि प्रवाशांना नवीन प्रणालीचे पालन करावे लागेल असा दावाही केला जात आहे. तथापि, ही खोटी बातमी आहे.

या बातमीमुळे प्रवाशांमध्ये उत्सुकता आणि गोंधळ निर्माण झाला, कारण आपत्कालीन परिस्थितीत प्रवास करणाऱ्यांसाठी तत्काळ तिकिटे खूप महत्त्वाची असतात. अशा परिस्थितीत, आयआरसीटीसीने अधिकृत निवेदन देऊन परिस्थिती स्पष्ट केली आहे. यासोबतच, एजंट्सच्या बुकिंग वेळेत कोणताही बदल झालेला नाही, अशी माहिती रेल्वेने दिली. मध्य रेल्वेनेही हा खोटा दावा फेटाळून लावला आहे आणि प्रवाशांना अफवांवर लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे. रेल्वेने स्पष्ट केले आहे की सध्याचे वेळापत्रक आणि नियम अबाधित राहतील. प्रवाशांनी दिशाभूल करणाऱ्या बातम्या टाळाव्यात आणि फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा.

तत्काळ तिकिटांमधील फसवणुकीबाबत यापूर्वीही अनेक खुलासे झाले आहेत. अनेक बनावट एजंट असे काम करायचे, जे सॉफ्टवेअरद्वारे बनावट तिकिटे देऊन लोकांना फसवत असत. अलिकडेच कोणीतरी तत्काळ तिकिटांबाबत एक बनावट मेसेज व्हायरल केला होता, जो आयआरसीटीसीने बनावट असल्याचे घोषित केले आहे.

तत्काळ तिकिटाचा कोटा काही मिनिटांत भरला जातो. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे, या दिवसात गाड्या भरलेल्या असतात. आणि लोकांना फक्त तत्काळ तिकिटावरच आशा आहे, पण तेही अनेक गाड्यांमध्ये उपयुक्त नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment