

Home Loan Interest Rate Cut : देशातील तीन मोठ्या सरकारी बँकांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. तिन्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी MCLR कमी केला आहे. जुलैच्या सुरुवातीला, सरकारी बँकांनी पंजाब नॅशनल बँक (PNB), इंडियन बँक आणि बँक ऑफ इंडियाने त्यांच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये ५ बेसिस पॉइंट्स (bps) कपात केली आहे. ५ बेसिस पॉइंट्स म्हणजे दर ०.०५ टक्के कमी केला आहे. ही कपात अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फेब्रुवारी २०२५ पासून रेपो रेटमध्ये एकूण १०० बेसिस पॉइंट्स म्हणजेच १% कपात केली आहे. यामुळे सामान्य लोकांना कर्जावरील व्याजदर कमी होतील आणि EMI मध्ये दिलासा मिळेल.
MCLR म्हणजे काय?
MCLR हा किमान व्याजदर आहे ज्यावर बँका कर्ज देऊ शकतात. हा दर कोणत्याही कर्जाची किमान मर्यादा निश्चित करतो. जोपर्यंत RBI कडून स्वतंत्र सूचना येत नाहीत तोपर्यंत बँका यापेक्षा कमी व्याजदर आकारू शकत नाहीत. आता देशातील तीन मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी MCLR कमी केला आहे.
- सहा महिने : ८.८०% ते ८.७५%.
- एक वर्ष (गृहकर्जांसाठी) : ८.९५% ते ८.९०%.
- तीन वर्षे : ९.२५% ते ९.२०%.
हेही वाचा – रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये झाले ७ मोठे बदल! आता OTPद्वारे होणार Tatkal बुकिंग, प्रवास होणार अधिक सोपा
इंडियन बँकेचे नवीन दर
इंडियन बँकेने काही कालावधीसाठी व्याजदरात ५ बीपीएसची कपात केली आहे, जे ३ जुलैपासून लागू होतील.
- ओवरनाइट : ८.२०% या दरात कोणताही बदल केलेला नाही.
- एक महिना : ८.४५% ते ८.४०%.
- तीन महिने : ८.६५% ते ८.६०%.
- सहा महिने : ८.९०% ते ८.८५%.
- एक वर्ष : ९.०५% ते ९.००%.
बँक ऑफ इंडियाचीही दर कपात
बँक ऑफ इंडियाने १ जुलै २०२५ पासून सर्व कालावधीसाठी MCLR दर ५ bps ने कमी केले आहेत.
- ओवरनाइट : ८.१५% ते ८.१०%
- एक महिना : ८.४५% ते ८.४०%
- तीन महिने : ८.६०% ते ८.५५%
- सहा महिने : ८.८५% ते ८.८०%
- एक वर्ष : ९.०५% ते ९.००%
- तीन वर्षे : ९.२०% ते ९.१५%
ग्राहकांना दिलासा
MCLR मध्ये या कपातीनंतर, कर्ज घेणाऱ्यांचा EMI काही प्रमाणात कमी होऊ शकतो. विशेषतः ज्या ग्राहकांना कर्ज MCLR शी जोडले आहे त्यांना फायदा होईल. RBI च्या रेपो दर कपातीनंतर, बँकांचा हा निर्णय ग्राहकांना मोठा दिलासा देऊ शकतो.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!