MPSC मध्ये मोठा बदल! अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती

WhatsApp Group

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी विवेक लक्ष्मीकांत भीमनवार (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 316 (1) अन्वये राज्यपालांनी ही नियुक्ती केली असून, विवेक भीमनवार यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून सहा वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी होईल तोपर्यंत) ते या पदावर कार्यरत राहणार आहेत.

अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारेपर्यंत, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 316 (1-क) नुसार डॉ. अभय एकनाथ वाघ, सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment