अफगाणिस्तानी क्रिकेटरच्या 2 वर्षीय मुलीचे निधन, सहकाऱ्याने दिली बातमी

WhatsApp Group

Afghanistan Cricketer Daughter Passed Away : गेल्या काही दिवसांपासून भारतात उत्साहाचे वातावरण आहे. आधी चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजय आणि नंतर होळीचा उत्सव. भारतातील लोक उत्सवात मग्न असताना, अफगाणिस्तानचा सलामीवीर हजरतुल्लाह झझाईच्या घरी शोककळा पसरली. गुरुवारी त्याच्या मुलीचे निधन झाले. संघाचा स्टार सलामीवीर करीम जनतने सोशल मीडियावर याची पुष्टी केली. जन्नतने ही दुःखद बातमी शेअर केली आणि झझाई आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती तीव्र शोक व्यक्त केला.

झझाई तीन महिन्यांपूर्वी झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळताना दिसला होता. “माझा जवळचा भाऊ हजरतुल्लाह झझाईने त्याची मुलगी गमावली आहे हे कळवताना मला खूप दुःख होत आहे,” असे जनतने शुक्रवारी इंस्टाग्रामवर पोस्ट केले.  

हेही वाचा – तुमच्या कामाची गोष्ट! एक ग्राहक म्हणून तुमचे ५ अधिकार, जाणून घ्या

झझाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या अफगाणिस्तान संघाचा भाग नव्हता. त्याने २०१६ मध्ये युएई विरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आणि त्यानंतर त्याने १६ एकदिवसीय आणि ४५ टी-२० सामने खेळले आहेत. १६ एकदिवसीय आणि ४५ टी-२० सामन्यांमध्ये, झझाईने ३६१ आणि ११६० धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत झझाई दुसऱ्या क्रमांकावर आहे, जेव्हा त्याने देहरादूनमध्ये आयर्लंडविरुद्ध फक्त ६२ चेंडूत १६२ धावा केल्या, ज्यामध्ये ११ चौकार आणि तेवढेच षटकार होते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment