‘आम्हाला काही कळत नाही…’ सुनील गावसकर संतापले, रोहित शर्मावर नेम?

WhatsApp Group

Sunil Gavaskar : भारताने सिडनी कसोटी आणि बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावल्यानंतर माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर खूप संतापले. त्यांनी संघ व्यवस्थापन आणि कर्णधार रोहित शर्मावरही निशाणा साधला. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी माजी क्रिकेटपटूंना काही कळत नाही, मग ते काय सल्ला देणार, असा टोलाही त्यांनी लगावला. गावसकर यांचे हे वक्तव्य रोहित शर्माच्या विधानानंतर आले आहे ज्यात रोहितने माजी क्रिकेटपटू आणि पत्रकारांवर प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर गावसकर संतापले आणि त्यांनी कठोर शब्द उच्चारले.

सिडनी कसोटी संपल्यानंतर सुनील गावसकर विचारण्यात आले की, ‘दौऱ्यापूर्वी सामने खेळून भारताने चांगली तयारी करावी का? तुम्ही मालिकेपूर्वीच सराव सामने खेळायला सांगितले होते.’ यावर ते म्हणाले, ‘अहो, आम्हाला काही कळत नाही. आम्हाला क्रिकेट माहीत नाही. आम्ही फक्त टीव्हीवर बोलण्यासाठी आलो आहोत. आमचे ऐकू नका. ते तुमच्या डोक्यावरून जाऊ द्या.

रोहितच्या या वक्तव्यावर गावसकर संतापले

सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधला. त्यांनी कोणाचेही नाव न घेता माजी क्रिकेटपटू आणि पत्रकारांवर हल्लाबोल केला. भारतीय कर्णधार म्हणाला होता, ‘आत माईक, लॅपटॉप किंवा पेन घेऊन बसलेले आम्ही काय करायचे ते ठरवणार नाही. काय बरोबर आणि काय चूक हे आपल्याला माहीत आहे. मी दोन मुलांचा बाप आहे, त्यामुळे मला आयुष्यात काय हवे आहे याची थोडीफार कल्पना आहे.’

हेही वाचा – अविवाहित जोडप्यांनो, स्वतःचे प्रेमाचे घर शोधा! OYO मध्ये प्रवेशावर बंदी

या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर रोहित शर्माने कर्णधारपद आणि फलंदाजी या दोन्ही बाबतीत निराश केले. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये त्याने तीन सामने खेळले पण त्याने 31 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 10 धावांची होती. इतकंच नाही तर रोहित शर्माने सिडनीत खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीपासून स्वतःला दूर केलं होतं. याबद्दल बोलताना भारतीय कर्णधार म्हणाला होता की संघाला पुढे ठेवणे महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच त्याने निवड समिती आणि प्रशिक्षकांना सांगितले की त्याच्या बॅटमधून धावा होत नसल्यामुळे त्याने या सामन्यातून माघार घ्यावी.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment