

Asia Cup 2022 : दुबईच्या मैदानावर आज पुन्हा एकदा चाहत्यांना भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमनं प्रथम भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची वादळी सुरुवात आणि विराट कोहलीचं सलग दुसरं अर्धशतक याच्या जोरावर भारतानं पाकिस्तानला १८२ धावांचं आव्हान दिलं आहे.
भारताचा डाव
केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या षटकापासून हाणामारीला सुरुवात केली. रोहितनं टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकण्याच्या अंदाजातच फलंदाजी केली. राहुल सुरुवातीला सावध राहिला, पण रोहितचा आक्रमकपणा पाहून तोसुद्धा मोठे फटके खेळला. दोघांची अर्धशतकी भागीदारी सहाव्या षटकापर्यंतच पूर्ण झाली. हारिस रौफनं रोहितला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. रोहितनं ३ चौकार आणि २ षटकारांसह २८ धावा केल्या. पुढच्याच षटकात शादाब खाननं राहुलला झेलबाद केलं. राहुलनं १ चौकार आणि २ षटकारांसह २८ धावा केल्या.
Virat Kohli top scores yet again as India post a formidable total; will it be enough? 🤔
#INDvPAK | #AsiaCup2022— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 4, 2022
हेही वाचा – IND Vs PAK : जोशा जोशात घातला घोळ..! टॉसदरम्यान शास्त्री मास्तरांचा ‘मोठा’ गोंधळ; VIDEO व्हायरल
चांगल्या फॉ़र्मात असलेल्या सूर्यकुमार यादवला (१३) आणि ऋषभ पंतला (१४) आज जास्त काही करता आलं नाही. पहिल्या सामन्याचा हिरो हार्दिक पंड्या खातंही खोलू शकला नाही. मोहम्मदद हसनैननं त्याला नवाजकरवी झेलबाद केलं. विराट कोहलीनं एक बाजू लावून धरत फलंदाजी केली. १८व्या षटकात विराटनं सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. शेवटच्या षटकात विराट धावबाद झाला. त्यानं ४ चौकार आणि एका षटकारासह ६० धावा केल्या. २० षटकात भारतानं ७ बाद १८१ धावा केल्या. पाकिस्तानकडून शादाबनं २ बळी घेतले.
Fourth half-century against Pakistan in T20Is 👏🏻#INDvPAK | #AsiaCup2022 | 📝 Scorecard: https://t.co/tV9iUvu6z1 pic.twitter.com/hcnHZnmZxK
— ICC (@ICC) September 4, 2022
दोन्ही संघांची Playing 11
भारत – केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान – मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह.